ग्रामरोजगार सेवकांचे थकीत मानधन द्या ग्रामरोजगार सेवक संघटनेची मागणी

30

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.23मार्च):-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (मनरेगा) अंतर्गत ग्रामरोजगार सेवक गेल्या १५वर्षापासून पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये काम करीत आहेत परंतु त्यांना मानधन,प्रवास भत्ता, अल्पोहार भत्ता ,सादिल खर्च तथा वार्षिक प्रोत्साहन भत्ता वेळेवर मिळत नाही, त्यातच भेटत असलेल्या तुटपुंजा मानधनात आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह व पालन पोषण करावे लागत आहे, त्यामुळे या रोजगार सेवकांची अत्यंत दयनीय अवस्था आहे.
त्यामुळे त्यांना १५ वर्षाचा प्रवास भत्ता, अल्पोहार भत्ता ,सदिल खर्च, आणि २०१९ ते २०२० या दोनवर्षाचे वार्षिक प्रोत्साहन भत्ता सुद्धा मिळाला नसल्याने या रोजगार सेवकावर उपासमारीची वेळ आहे, त्यामुळे शासनाने या रोजगार सेवकांचा फिक्स पगार करून वैयक्तिक खात्यात जमा करावा.

ज्या रोजगार सेवक कुटुंबातील वारसांना अनुकंप चा लाभ घ्यावा शासनाच्या इतर संपूर्ण शासकीय नोकरीतील सवलती रोजगार सेवकांना द्याव्या आठ मार्च रोजी शासनाने घेतला शासन निर्णय हे रोजगार सेवक आचा अपेक्षाभंग करीत असल्यामुळे हा शासन निर्णयात तात्काळ सुधारणा करावी अन्यथा आम्हाला रोजगार सेवक संघटनेच्यावतीने राज्यातील संपूर्ण तहसील कार्यालय समोर अमरण उपोषण अशी निवेदन ग्राम रोजगार सेवक विलास जोगदंडे यांनी गट विकास अधिकारी यांच्या मार्फत शासनाला पाठवले आहे. ग्रामीण भागातील रहिवाशांना रोजगार हमीची कामे मिळवून देण्याकरिता ग्रामरोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात सुमारे २७ हजार, ग्रामरोजगारसेवक कार्यरत आहेत.

काम मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना रोजगार हमीची कामे मिळवून देणे, सर्व कामांचे मस्टरवर हजेरी घेणे,मस्टर पं.स.पोच करणे ,सर्व रेकॉर्ड जतण करणे पंचायत समितीला वेळोवेळी याबाबतची माहिती देणे यांसारखी कामे हे ग्रामरोजगार सेवक करीत आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना शासनाच्या नियमानुसार मानधन व भत्ते दिले गेले नसल्याची कैफियत संघटनेच्या वतीने मांडली आहे. या सेवकांना अन्य राज्यांप्रमाणेच दरमहा किमान फिक्स वेतण मिळावे, ही मागणीदेखील प्रलंबित आहे. या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास ग्रामरोजगार सेवक प्रत्येक तहसील कार्यालयासमोर
१ मे२०२१पासुन आमरण उपोषण सुरू करण्याचा,इशारा संघटनेच्या वतीने विलास जोगदंडता,अध्यक्ष पंजाबराव राठोड,उपाध्यक्ष.मिलींद पठाडे,सचिव. संभाजी कपाटे,लव्ही पवार,ऊल्लास पवार, क्रष्णा चव्हाण,अविनाश सावंत,तुळशीराम काटे,संजय धुळे, आदींनी रोजगार सेवकांनी इशारा दिला आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~