२५० पात्र झोपडी धारकांचे भाडे गिळणाऱ्या विमल शहा वर ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवा

35

🔹डेमोक्रॅटिक आरपीआय महासचिव डॉ. माकणीकर यांची मागणी

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.26मार्च):-अंदाजे २५० पात्र झोपडी धारकांचे मागील ३ वर्षांपासूनचे थकीत भाडे गिळणार्या आकृती हब टाऊन विकासक विमल शहा व त्याचा साथीदार मुरजी पटेल यांचेवत ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

एमआयडीसी अंधेरी पूर्व झोपडपट्टी सुधार योजने अंतर्गत शासनाच्या प्रकल्पात आकृती हब टाऊन सोबत करार झाल्याने विकासक विमल शहा याच्या वर विश्वास ठेवून गरीब पात्र झोपडीधारकांनी स्वतःची झोपडी तोडून दिली आहे.

“त्या” गरीब झोपडीधारकांचे प्रकल्पाला भरीव समर्थन असतांना आज २० वर्ष उलटली परंतु आज देखील त्यांना सदनिकेचा ताबा देण्यात आला तर नाहीच मात्र: घरभाडे सुद्धा देण्यात येत नाही हो गोर गरीब जनतेची फसवणूक आहे. या गोष्टीवर पायबंद करणे अत्यावश्यक आहे.

ही पीडीत जनता आजही त्रस्त असून काहीजण रस्त्यावर भटकंती करून उदरनिर्वाह करत आहेत, काही जण आत्महत्येस प्रवृत्त झाले आहेत अश्या परिस्तिथीत विमल शहा वर त्याचा चोर साथीदार मुर्जीं पटेल बिंनघोर जीवन जगत आहेत, व प्रकल्पात वेगवेगळ्या पद्धतीने चोऱ्या करत आहेत.

उद्योग सारथी अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फतीने या तक्रारीचा आशय घेऊन विकासक विमल शहा व महादलाल मुरजी पटेल यांच्या वर ४२० प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांची व प्रकल्पातील त्या-त्या समयीच्या अधिकाऱ्यांची वंशावळ चौकशी करन्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे पदाधिकारी डॉ. राजन माकणीकर व कॅ. श्रावण गायकवाड यांनी एमआयडीसी अधिकारी व पोलीसांना केली आहे.