हनुमंत ज्ञानोबा लहाने यांचे दुःख निधन

34

✒️अहमदपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदपूर(दि.29मार्च):- माकेगाव तालुका रेणापूर येथील हनुमंत ज्ञानोबा लहाने यांचे कोरोना मुळे ग्लोबल हाॅस्पिटल पूणे येथे दुःख निधन झाले आहे.हनुमंत लहाने हे पूणे येथे सी.वाय.डी.पाटील नर्सिंग कॉलेज पूणे येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.वयाच्या 47 व्या वर्षी त्यांचे ग्लोबल हाॅस्पिटल मध्ये कोरोना मुळे निधन झाले.

नर्सिंग काॅलेजच्या माध्यमातून अनेक गोरगरीबांच्या मुला मुलींना शिक्षण देऊन नौकरी लावण्यात यशस्वी झाले आहेत.सामाजिक चळवळीत एक चांगला ठसा उमटविला होता.दु:खद निधनाने जिल्ह्यांत व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. असुन प्रसिद्ध अॅड प्रभाकर ज्ञानोबा लहाने यांचे भाऊ होते , बहिण,पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा मोठा परिवार आहे.