✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.29मार्च):- तालुक्यातील मिनकीच्या पूढे माळरान चढतीला महादेव मंदीरा जवळ दोन मोटार सायकलची समोरासमोर टक्कर होऊन दोघेही जागीच ठार झाल्याची घटना दिनांक २८ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली आहे.सविस्तर वृत्त असे की संतोष लक्ष्मण गायकवाड राहणार सगरोळी वय २६ याने मोटार सायकल क्रमांक टी.एस.७ एफई ५२९१ या दुचाकीवरून निघाला होता तर भगवान गंगाधर नरवाडे वय २७ मोटार सायकल क्रमांक टी.एस.०१ ई.सी.५८०७ याने बिलोलीहुन आदमपूरकडे निघाला होता.दोघांच्याही मोटार सायकलची मिनकाच्या पूढे माळरान महादेव मंदीरा जवळ समोरासमोर टक्कर होऊन यात संतोष गायकवाड व भगवान नरवाडे हे दोघेही जागीच ठार झाले आहे.

या घटनेची माहीती बिलोली पोलीस ठाण्याला मिळताच येथील पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सलगले,भारत फंताडे, सुनिल,दस्तगिर,जनार्धन बोधने यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केले.तर रूग्नवाहीका चालक सोनकांबळे प्रकाश यांनी मयतांना बिलोली येथील ग्रामिण रूग्णालयात पोहचविण्यास मदत केली असुन मयतांच्या कुटूंबांनी एकमेकाविरूध्द परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.मयत भगवान नरवाडे यांच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी असा परीवार आहे.तर संतोष गायकवाड यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परीवार असुन हे दोघेही तरूण वयात ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED