गुरांच्या गोठयाला आग, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

कोरपना(दि.30मार्च):-हिरापूर गाव शेजारिल जनावरांच्या गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्यासह बैलाचा चारा जळून खाक झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील हिरापूर येथे सोमवार दुपारी दोन च्या सुमारास घडली. सदर घटनेत शेतकऱ्याच लाखोंचे नुकसान झाले. हिरापूर येथे मय्यत घेऊन जात असताना फटाका उडून श्री-अनिल लोडे व श्री-अरविंद लोडे या शेतकऱ्याच्या गोठ्याला दुपारी आग लागली.

या गोठ्यात सिंचनाचे साहित्य, फवारणी पंप, शेती उपयोगी अवजारे व साठवून ठेवलेली चारा जळून खाक झाला. दरम्यान, तलाठी ,सरपंच,उपसरपंच यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे अहवाल सादर केला आहे.

गोठ्याला लागलेल्या आगीत शेतकरी लोडे यांचे एक लाख वीस हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकताच कोरोना व बोंड अळी त्रस्त सदर शेतकऱ्याने बाजारात विकलेल्या सोयाबीन, कापूस व तुरीला अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या गोठ्यास आग लागल्याने संकट ओढवले आहे.

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED