चिमुर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी

49

🔸शिवजयंतीवर कोरोनाचा प्रभाव

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमुर(दि.31मार्च):-महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती चिमुर येथे शिवसेनेच्या वतिने साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली
गेल्या वर्षा पासुन देशात कोरोना चे संकट देशावर वाढले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिबसेना पक्ष प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे यांच्या आदेशानवये व शिबसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनानुसार सगळ्या नियमाची दक्षता घेत आज साध्या पध्दतीने शिव जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजण चंद्रपुर जिल्ह्य उपजिल्हा प्रमुख श्री अमृतभाऊ नखाते यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी जेष्ट शिवसैनिक श्री, सुधाकर निवटे.शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख प्रमुख रमेश भिलकर, माजी युवसेना तालुका प्रमुख तथा भारतीय विद्यार्थी सेना माजी उपजिहा संघटक श्रीहरी सातपुते, सुरेश गजभिये, मोरेश्वर पोहीनकर, युवा सेना तालुका अधिकारी आशीष बगुलकर, हरीश कोरामे, देवराव जुमड़े, उपस्तित होते,