एसटी चालक वाहकास मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकास एक वर्ष कारावासाची शिक्षा

28

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.31मार्च):- एसटी चालक आणि वाहकास मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकास न्यायालयाने एक वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली ही घटना नाशिक शालिमार चौकात 2009 मध्ये घडली होती अनिल पांडुरंग कोरडे 26 (शिवाजी वाडी नासर्डी पूल )असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या रिक्षाचालकाची नाव आहे याप्रकरणी सुभाष रामू देवकर या एसटी चालक यांनी तक्रार दाखल केली होती देवकर हे 11 डिसेंबर 2009 रोजी देवळाली कॅम्प या शहर बसवर एम’ एच’ 12ये ,यु 94 66 सेवा बजावत असताना हा प्रकार घडला होता शालिमार चौकात त्यांनी एसटी बस समोर उभी असलेली ऑटोरिक्षा एम .एच 15 झेड 76 49 बाजूला घेण्यास सांगितल्याने हा वाद झाला होता.

संतप्त अनिल कोरडे या चालकाने बस चालक देवकर व वाहक राजू डगळे यांना शिवीगाळ करत व धमकी देत लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली होती याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तात्कालीन उपनिरीक्षक अरबी रेसेंड या गुन्ह्याचा तपास करून पुराव्यानिशी दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक( 9 )चे न्यायमूर्ती एम ए शिंदे च्या समोर चालला सरकारतर्फे आर वाय सूर्यवंशी यांनी काम पाहिले पोलीस कर्मचारी टी ई लफडे आणि आर आर जाधव यांनी खटल्यासाठी यशस्वीतेसाठी पाठपुरावा केला या खटल्यात फिर्यादी साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष तसेच तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेला पाठपुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अनिल कोरडे यास एक वर्षाचा सक्षम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.