✒️चक्रधर मेश्राम(विशेष प्रतिनिधी)मो:-96234 59632

गडचिरोली(दि.1मार्च):-गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रकारच्या विकास कामांची जबाबदारी लोक प्रतिनिधीं कडून करण्यात येईल असा विश्वास ठेऊन आणि त्या निर्वाचन क्षेत्रात योग्यरित्या विविध विकास योजना राबविल्या जातील. अशा अनेक आशा ठेऊन निवडणूकीत निवडून दिले जाते. परंतु नुकतेच विश्वसनीय सुत्रांनी हाती दिलेल्या ऑडिओ क्लिप वरून आमदार डॉ. देवराव होळीचा असली चेहरा पुढे आला आहे. क्लिपच्या आधारे आमदार होळी यांचेवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि सभासदत्व रद्द व्हायला पाहिजे. हे विशेष!! नाहीतर नैतिक जबाबदारी म्हणून आमदार पदाचा राजीनामा द्यावा.. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

गडचिरोली येथे नॅशनल चॅनेल असलेल्या सहारा टी व्ही. आणि विदर्भ युट्युब न्युज चॅनेल चे प्रतिनिधी म्हणून काम करीत असलेले रितेश वासनिक यांनी आपल्या जाहिरातीचे बिल मागीतले होते. जाहिरातच्या बिलांची वसुलीसाठी रितेश वासनिक यांनी मागणी केली आणि ते काम प्रतिनिधीना करावे लागते. तो त्याच्या कामाचा आणि अधिकाराचा भाग आहे. तिन… चार वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन जाहिरात बिल न देता आम. होळी हे अपमानास्पद संभाषण करीत होते.

भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या पदाचा तोरा दाखवित पत्रकार रितेश वासनिक यांचेशी असभ्य, गैरवर्तणूक, अपमानास्पद, इतकेच नव्हे तर कमरेच्या खालचाही शब्द बोलत असताना आमदाराला भान होते की नाही?? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पदवीने माणसांचे डॉक्टर आणि पदाने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाच्या तिकिटावर निवडून दिलेले आमदार यांनी बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे. एका नॅशनल लेवलच्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला ” मुखऀ, अबे, नालायका,, साल्या,, करनबे, पाहून घेईन, चॅलेंज करतोनबे, काय करशील?? तर एक शब्द कमरेच्या खालचाही बोलायला विसरले नाही. सदर वृत्तवाहिनी चे प्रतिनिधी रितेश वासनिक हे मनमिळाऊ, साधेपणाने वागणारे, सत्य बोलणारे असुन निर्भीडपणे काम करतात. यासंदर्भात रितेश वासनिक यांचेशी संपर्क केला असता या घटनेची माहिती खरी असल्याचे सांगितले. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे आता आपल्याच तोऱ्यात अपशब्द, अपमानास्पद शब्दात संभाषण करण्याची नशा उतरत असल्याचे चौकाचौकात ऐंकायला मिळत आहे.

Breaking News, गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED