आर्थिक सहाय्य योजना मधील अनुदान मिळण्याची मागणी

27

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतींनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.4एप्रिल):-सील कार्यालया मधील संजय गांधी निराधार योजना विभागातील दारिद्र्य रेषेच्या खालील कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्यास त्यांच्या वारसदारांना एक वेळेस 20 हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते. परंतु सदरील अनुदान देत असतांना कार्यालकडून दिरंगाई होत असल्याचे दिसते त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेमधील कुटुंबाला आधार म्हणून हे अनुदान तातडीने देण्यात यावे यासाठी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक श्री सखाराम बोबडे यांनी एका निवेदनाद्वारे आहे.

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कुटुंबाचा आधारवड कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्यास एका वर्षाच्या आतमध्ये आर्थिक सहाय्य प्रस्ताव तहसील कार्यालमध्य दाखल केल्यास संबधित महिला पुरुष वारसदारास तातडीने मदत निधि देण्याची तरतूद असतांना संबधित कार्यालयाकडून त्यांची दखल घेतली जात नाही. 2016 पासूनचे अर्ज पेंडिंग असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वारस दारांना तत्काल अनुदान देण्याची मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक श्री सखाराम बोबडे यांनी एका निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्या केली आहे निवेदनावर सखाराम बोबडे, राहुल साबने यांच्या स्वाक्षरी आहेत.