बागपिंपळगाव ते सावरगाव रस्ता पुलाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने अपघाताची शक्यता बळावली – अक्षय पवार

27

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.4एप्रिल):- गेवराई तालुक्यातील महत्वाचा व नेहमी वर्दळ असलेला बागपिपंळगावं फाटा ते तलवाडा हा सोळा कि.मिटर अंतराचा रस्ता अंत्यत खराब झाला होता.आता हा रस्ता अंत्यत चांगला झाला आहे.मात्र रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत असुन या अर्धवट पुला मुळे रात्रीच्या वेळेला अपघात होण्याची भिती असुन त्यामुळे हे काम त्वरित पुर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन यांनी केली आहे.
तालुक्यातील अंत्यत महत्वाचा असलेला व नेहमी वर्दळ असलेला बागपिंपळगावं फाटा ते तलवाडा या सोळा कि.मीटर अंतराच्या राज्य मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून अंत्यत खराब झाला होता.त्यात या रस्त्याला दोन वर्षा पुर्वी निधी मिळुन चांगले काम पण झाले आहे.

मात्र याच रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी मोठाल्या पुलाचे काम गेल्या अनेक महिन्या पासुन सुरू आहे. हे सर्व पुल अर्धवट अवस्थेत असुन याचे काम देखिल बंद पडले आहे.त्यामुळे येणा-या जाणा-या वाहन धारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ मोठाली गावे असल्याने रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहणाची ये जा चालु असते.त्यामुळे या अर्धवट रखडलेल्या पुलाचे काम त्वरित सुरू करून पुर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार,जयसिंग माने,शेख मोहसिन सह अनेकांनी केली आहे.
चौकट – या रस्त्याचे काम झाले मात्र रस्त्यावरील अर्धवट पुलाचे काम गेल्या आनेक पासुन सुरु आहे ते काम तसेच रखडले असुन त्या मुळे येणा-या जाणा-या वाट सरुंच्या मनात आपघाताची शक्यता बळावली आसल्याने हे काम जल्द गतीने करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅगेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांनी केली आहे