जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हनेगावच्या विजयसिंह बाळासाहेब देशमुख यांचा दणदणीत विजय

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

हणेगाव(दि.5एप्रिल):-मागील एक महिण्यापासून जोरदार चालू असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कुणाच्या नावाने एक तर नांदेड जिल्ह्याचे खासदार मा.प्रताप पाटील चिखलीकर का नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांच्यानावाने ओळखायचं.ते आज सिद्ध झाले,ते म्हणजे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा,अशोकराव चव्हान यांच्याच नावाने शिक्का मोर्तब झाला.

या निवडणूकीत सगळ्यांचे लक्ष फक्त देगलूर तालुक्यावर होते,ते म्हणजे बिजेपी प्रणित सहकार विकास पॕनलचे सौ.गोदावरीबाई माधवराव सुगावकर यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यात जास्त परिश्रम मरखेल गणाचे जिल्हा परिषद सदस्य व बिजेपीचे जिल्हाध्यक्ष मा.व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी अहोरात्र झटून सुद्धा शेवटच्या क्षणी कमी पडले व त्यांचा उमेदवार ६ मतांनी पराभव झाला.

यावेळी कॉग्रेस प्रणित समर्थ सहकार पॕनलचे उमेदवार मा.विजयसिंह बाळासाहेब देशमुख यांना मा. पं समिती सभापती व मागील काळातील बँकेचे संचालक शिवाजीराव देशमुख बळेगावकर,मा.जि.परिषद उपाध्यक्ष रमेश देशमुख शिळवणीकर,डॉ.विजयसिंह धुमाळे,व सध्या घडीला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे सर्व पदाधिका-यांनी सर्वतोपरी जोड लावून व राष्ट्रीय कॉग्रेसचे देगलूरचे तालुकाध्यक्ष मा.प्रितमजी बाळासाहेब देशमुख यांनी संपूर्ण ताकदीनिशी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचे प्रयत्न करून देगलूर तालुक्यातील प्रत्येक चेरमनच्या घरोघरी जाऊन विजयसिंह बाळासाहेब देशमुख यांना निवडून द्यावे.

असे आग्रह करून त्यांना प्रोत्साहित केले व आपल्या उमेदवाराला ६ मतानी निवडून आणले.त्यातच मा.पालकमंत्री यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता पुर्ण केले.यावेळी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत एकवीस जागापैकी कॉग्रेस प्रणित समर्थ सहकार पॕनलचे १७ तर बिजेपी प्रणित सहकार विकास पॕनलचे ४ उमेदवार निवडून आले.यावेळी विजयसिंह देशमुख यांच्या निवडीने संपूर्ण परिसरात फटाक्यांच्या अतिषबाजीचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED