तलवाडा येथील सरपंच व उप सरपंचाच्या पुढाकाराने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण

30

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधि)

गेवराई(दि.5एप्रिल):- तालुक्यातील तलवाडा येथे जुने बस स्थानकच्या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा असुन या पुर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे आशी मागणी गेल्या आणेक दिवसापासुन समोर येत होती या बाबतीत तलवाडा ग्रामपंचायत मध्य नव्याने निवडुन आलेले.

सरपंच विष्णु तात्या हात्ते ऊप सरपंच आज्जुभाई सौदागर यांनी सर्व सन्माननिय सदस्य व गावक-यांशी चर्चा करुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करन्याचा निर्णय घेऊन ख-या अर्थाने तलवाडा गावच्या विकासाला सुरुवात केल्याचे दिसुन येत आहे.

बोले तैसा चाले तयाची वंदावे पाऊले या म्हणी प्रमाणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या येणा-या 14 एप्रिल च्या जयंतीचे आवचित्य साधत दिं. 4 एप्रिल रोजी स्वताह या ठिकाणी उपस्थिति राहुन सरपंच विष्णु तात्या हात्ते ऊप सरपंच आज्जुभाई सौदागर यांनी तब्बल चार तास वेळ देत औरंगाबाद येथील कारागिरा मार्फत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याचे सुशोभीकरण करुन घेतले.

या अभिनंदनिय बाबीची दखल घेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी बांधवांनी पुतळा परिसरात सरपंच व उप सरपंचाचा सत्कार करुन तलवाडा गावच्या पुढिल विकासत्मक कामे करन्यासाठी शुभेच्छा दिल्या या वेळी तलवाडा ग्रामपंचायतचे सर्व सन्माननिय सदस्य प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव उपस्थिति होते.