पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांच्या कडुन आपदग्रस्तांना आर्थिक मदत

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.7एप्रिल):- जनसेवा हिच ईश्वरसेवा आहे असे समजुन पालकमंत्री विजय वडेट्टिवार नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावुन जात असतात. याच अनुषंगाने ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध आपदग्रस्तांना राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांच्या कडुन आर्थिक मदत करण्यात आली आहे.आपदग्रस्त कुटुंबियांच्या बाबतीत माहिती मिळताच वडेट्टीवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तात्काळ सदर आपदग्रस्त कुटुंबियांना मदत नेऊन देण्याच्या सूचना केल्या.

यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा येथील नमिता सुर्यभान बोदेले, मनोहर दिनाजी ढोरे, सुबोध पुष्पराज शेंडे व पिंपळगाव(ख) येथील प्रशांत विनायक कामथे , रणमोचन येथील मांदाळे, चौगान येथील प्रदिप पिलारे ह्यांच्या आपदग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. व सर्व कुटुंबियांची आस्थेने विचारपुसही करण्यात आली.

हि मदत देतांना काँग्रेस कमेटिचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, अण्णाजी ठाकरे बाबुसाहेब रूई, भारतीय किसान काँग्रेस चे तालुकाध्यक्ष नानाजी तुपट , रूई सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उत्तम बनकर, खरकाडाचे माजी सरपंच रवींद्र ढोरे, मंगेश दोनाडकर, सोमेश्वर उपासे हे यावेळी उपस्थित होते.