राहुरी येथील पत्रकार हत्याकांडातील गुन्हेगारांना कठोर शासन करावे

23

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे मागणी

✒️राहुरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

राहुरी(दि.8एप्रिल):- राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्येची चौकशी करून या हत्याकांडातील गुन्हेगारांना शोधून त्यांना कठोर शासन करण्याची मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे काल दुपारी समाजकंटकांनी अपहरण केले रात्री त्यांचा मृतदेह सापडला याबद्दल महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एका पत्रकारांची दिवसाढवळ्या अपहरण करून निर्दयपणे हत्या होते ही लांच्छनास्पद बाब आहे.

दातीर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून राहुरी परिसरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेच्या कल्याणासाठी आवाज उठवला होता.पत्रकार दातीर यांची दिवसाढवळ्या अपहरण करून निर्दयपणे हत्या करणा-या गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे केली आहे.