बहुचर्चित प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणात २९ साक्षीदारांची साक्ष पुर्ण

24

🔸दोन साक्षीदारांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सने

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.8एप्रिल):-शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणाची सुनावणी आज ८ एप्रिलला शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात प्रशिध्द सरकार वकील ॲड उज्वल निकम व सरकारी वकील ॲड दिपक वैद्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

यावेळी आज एका साक्षीदारांची साक्ष हि व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आल्याची तसेच या खटल्यात सरकारी पक्षातर्फे साक्ष पुराव्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांनी दिली आहे.

आज पर्यंत या प्रकरणात एकुण २६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती.आज तपास अधिकाऱ्यांसह अन्य दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांची उलटतपासणी बाकी असून ती उद्याला म्हणजे ९ एप्रिलला घेण्यात येणार असल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील ॲड भूपेंद्र सोने यांनी दिली आहे.