तलवाडा येथील शनिवार चा आठवडी बाजार बंद

27

🔹व्यापारी,भाजीविक्रेते व नागरिकांनी नोंद घ्यावी- सरपंच विष्णु हात्ते

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाड़ा(दि.9एप्रिल):- व तलवाडा परिसरातील व्यापारी,भाजीपाला विक्रेते,तसेच नागरिकांना ग्रामपंचायत तलवाडा मार्फत  आवाहन करण्यात आले आहे की, कोरोना (कोविड-19) च्या पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी बीड यांचे पुढील  आदेश येईपर्यंत तलवाडा येथील प्रत्येक शनिवार रोजी भरण्यात येणारा आठवडी बाजार बंदच राहणार आहे .याची सर्व व्यापारी,भाजीविक्रेते, ग्राहक व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत चे सरपंच विष्णू हात्ते ,उपसरपंच आक्रम सौदागर व ग्रामविकास अधिकारी मस्के यांनी आवाहन केले आहे.

कोरणाच्या महामारीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापार बंद करण्यात आले असून गर्दी होऊ नये यासाठी आठवडी बाजार बंद चा निर्णय घेण्यात आला आहे,त्याअनुषंगाने 10 एप्रिल शनिवार रोजी चा आठवडी बाजार  कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहेत,कोणत्याही व्यापाऱ्यांनी  शनिवारी गावात कोठेही आपली दुकान लावू नये तसेच  भाजीपाला विक्रेते यांनी ही कोठेही भाजीपाला विक्रीस बसू नये असे आढळून आल्यास आपल्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,व होणाऱ्या नुकसनास आपण स्वत: जबाबदार रहाल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून  कोणीही शनिवारी आठवडी बाजारात येऊ नये असे सरपंच विष्णु हात्ते,उपसरपंच आक्रम सौदागर आणि ग्रामविकास अधिकारी मस्के यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता ही खबरदारी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घेण्यात आली असून,आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या असल्याचे ही सरपंच, उपसरपंच,तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी कळवले आहे.