क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले जयंती व घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मराठवाडा किसान काँग्रेसचे संपूर्ण मराठवाड्यात रक्तदान शिबिर

25

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.10एप्रिल:-राज्यातील रक्ताचा अपुरा साठा लक्षात घेऊन *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत.

जिल्हा मुख्यालयी व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार असून आघाडी संघटना, विभाग व सेलच्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये सक्रीय सहभाग राहणार आहे.याचाच भाग म्हणून *मराठवाडा किसान काँग्रेस च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात दि.14 एप्रिल रोजी सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत.

घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने १४ तारखेला व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तसेच रक्तदान करून महामानवास अभिवादन करण्यात येणार आहे. या *रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन किसान काँग्रेस चे मराठवाडा अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेसचे राज्य निवड मंडळ सदस्य* ( काॅग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य) *अॅङ माधव जाधव यांनी केले आहे.*