आमदार समीर कुणावार यांनी घेतला कोरोना महामारी चा आढावा

28

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.10एप्रिल):-कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता आमदार समीरभाऊ कुणावार यांनी तातडीने यांच्या अध्यक्षतेखाली आज समुद्रपूर तालुक्याचा कोरणा आढावा बैठक पंचायत समिती सभागृह समुद्रपूर येथे घेण्यात आली.सदर बैठकीमध्ये कोरोना ग्रस्तांचा औषधोपचार त्याच प्रमाणे कंटेनमेंट झोन याबद्दल माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजना करणे, टेस्ट करून घेणे जे पेशंट कोरोना ग्रस्त आहे कोरोन टाईन आहे त्यांची प्रकृती वाढत असल्यास त्यांची माहिती ताबडतोब प्रशासनास देणे त्यांची दखल घेणे, त्यांचा योग्य औषधोपचार करणे या सर्व गोष्टीचा आढवा सदर बैठकीमध्ये घेण्यात आला.

दिवसें दिवस कोरोणाचे संक्रमण वाढतच चालले असून समुद्रपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेशंट दिसून आलेले आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन *आमदार समीरभाऊ कुणावार* यांनी केले. सदर कोरोना पहिल्यापेक्षाही मोठ्या झपाट्याने वाढत चालला असून त्याची सर्व नागरिकांनी दखल घेतली पाहिजे यावेळी प्रत्येक नागरिकांचा जीव वाचला पाहिजे याकरिता प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या.

सदर बैठकीमध्ये हिंगणघाट समुद्रपुर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत,तहसीलदार साहेब ,गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले, ग्रामीण रुग्णालयाच्या वैदकीय अधीक्षक डॉ.कल्पना म्हैसकर , पोलिस उपनिरीक्षक . राम खोत, पंचायत समितीचे उप-सभापती योगेश फुसे, जिल्हा परिषद सदस्य श्री. रोशनभाऊ चौके, पंचायत समिती व आरोग्य विभाग समुद्रपूर चे सर्व सन्माननीय पदाधिकारी* सदर बैठकीला उपस्थित होते.