आधार फाऊंडेशन हिंगणघाट च्या वतीने पोलिस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर यांचा सत्कार

🔹”वर्षा ची अर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती अशा परिस्थिती मध्ये तिने मेहनतीने व जिद्दीने मिळविलेले यश हे इतर विद्यार्थाना प्रेरणादायी असून हिंगणघाट शहरासाठी हीअतिशय गौरवाची बाब आहे” 

(अतुल वांदीले)संस्थापक अध्यक्ष आधार फाऊंडेशन,हिंगणघाट

✒️ इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.10एप्रिल):-शहरातील अतिशय गरीब कुटुंबातली मुलगी राणी तांदुळकर पोलिस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाली ही सर्व हिंगणघाट वासियांसाठी ही गर्वाची व अभिमानाची ची बाब आहे.इतरही विद्यार्थाना तिच्या पासून प्रेरणा मिळावी यासाठी आज आधार फाउंडेशनच्या वतीने वर्षा तांदूळकर पोलिस उपनिरीक्षक यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मोठमोठया पदांच्या स्वप्नासोबत खाकी वर्दीचं स्वप्न पाहणारे बहुतांश विद्यार्थी अंगावर खाकी येण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात जीवाचं रान करताना दिसतात.

त्यातील बहुतांश विद्यार्थी यशाचा अटकेपार झेंडा लावतात सुद्धा
हिंगणघाट शहरातील गाडगेबाबा या जुन्या वस्तीत राहणाऱ्या वर्षा उर्फ राणी तांदुळकर या मुलीने पदवीच्या शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितले,घरची गरिबीची परिस्थिती असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपण मोठया शहरात जाऊ शकत नाही हे तिनं जाणलं त्यामुळे हिंगणघाट शहरातील मार्गदर्शक अभ्यासिकेत तिने आपला अभ्यास पूर्ण केला घरी अभ्यासचं वातावरण नसताना व घरची परिस्थिती गरिबीची असताना या सर्व अडचणीचं तिला अभ्यासासाठी प्रेरणादायी ठरल्या,स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तिने अनेक परीक्षा दिल्या.

मार्च 2019 ला एमपीएससी परीक्षेतील अराजपत्रित पदांच्या निकालात वर्षा यशस्वी झाली एक वर्षाच्या ट्रेनिंग नंतर चंद्रपुर विभागांतील राजुरा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाली असून वर्षा तांदुळकरने दाखविले मेहनत व चिकाटी व जिद्दीने मिळविलेल्या यशाचं शहरातील इतर मुला मुलींना सुध्दा प्रेरणा मिळावी.

यासाठी त्याच्या सन्मान चिन्ह व वृक्ष देऊन श्री. अतुल वांदीले संस्थापक अध्यक्ष आधार फाऊंडेशन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भविष्यात तिने पुढेही यशाची अनेक शिखरे काबीज करावी यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस आधार फाउंडेशन श्री .पराग मुडे,कार्यकारी अध्यक्ष, चंद्रशेखर निमट,डॉ.प्रा.शरद विहिरकर,सुनील डांगरे ,जगदीश वांदिले,किशोर सोमवंशी, नितिन भूते, राहुल सोरटे,प्रवीणजी कावरे तसेच आधार फाउंडेशन चे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते .

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED