सायखेडा येथिल नियोजित जागेत भिम जयंती साजरी होणारच – दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले

23

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.11एप्रिल):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पाच सहा दिवसांवर आली असतानाच परभणी जिल्हात सोनपेठ तालुक्यातील सायखेडा या गावात भिमजयंती गेल्या 2पिढ्यांपासून साजरी होत आहे यावर्षी सुध्दा भिमजयंतीची तयारी जोरात चालू होती. पण यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही जागा बळकवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकानी केला.

त्यानी या जागेवर अतिक्रमण केले. अतिक्रमण काढण्याचे काम हे भिमसैनिक करत होते. तरूण महिला याठिकाणी साफसफाई करत असतानाच अचानकपणे जातीयवाद्यांनी कुर्हाडीने हल्ला केला.यामध्ये भिमसैनिकाच्या डोक्याला गंभीर मार लागला असून महिलांना सुध्दा मारहाण केली आहे. हा हल्ला करत असतांना निळा झेंडा खाली पडला तसेच शिविगाळ करत हा हल्ला जातीयवादी बांडगुळानी केला आहे.

त्या समाजकंटका वरती तात्काळ ३०७,अट्राॅसिटी अॅक्ट, विनयभंग अंतर्गत कार्यवाही झालीच पाहिजे, तसेच त्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवून नियोजित जागेवर भिमजयंती साजरी झाली पाहीजे असे आवाहन दलित पँथर चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी केले आहे.