कोविड-१९ ची दुसरी लाट : वेदनेचा कल्लोळ

21

जागतिक कोविड-१९ च्या महामारीने दुसऱ्या लाटेत पदार्पण केले असून नव्या बदलत्या विषाणू चैनने आरोग्य यंत्रणा हतबल ठरत आहे.आरोग्य यंत्रणा आपले सर्वस्व पणाला लावून सेवा देत आहेत.अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत घेतले आहेत तर काही देशात लॉकडाऊन लावल्या गेले आहेत. लॉकडाऊन भारतीय लोकांचे कंबरडे मोडले आहे.
आज देशात व जगात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.साऱ्या मानवी समाजात वेदनेचे कल्लोळ पाहावयास मिळत आहे.

भारतात दुसऱ्या लाटेने मोठे आव्हान उभे केले आहे.एक वर्षानंतरही आपण या आजारावर प्रभुत्व मिळवले नाही.देशात कम्युनिटी स्प्रेड होत असल्याने लोकांना अतिशय वेदनामय जीवन घालवावे लागत आहे.आज देशात लसीकरण मोहीम जोरात सुरू असली तरी प्रत्येक नागरिकांना लसी मिळेल यांची गँरन्टी सरकार देऊ शकत नाही.इतर देशानी लस निर्यात करून संवेदशीलता दाखवली असली तरी आपले नागरिक हाशियावर सोडून दुसऱ्या देशाला लस पुरविण्याचे कार्य ताबडतोब थांबले पाहिजे.कारण आज काही राज्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने काही लसीकरण केंद्र बंद करावी लागले आहेत.

देशात व महाराष्ट्रात राजकारणाची नवी विकृत मानसिकता तयार झाली आहे.मी पुन्हा येणार ..! यांचे तुणतुणे वाजवले जात आहे.वर्तमानात घडणाऱ्या घटनामुळे आरोपीच्या फैरीवर फैरी सुरू आहेत.राजकारण्यांनी महामारीतही माणूसकी सोडली आहे.देशाचा मुख्य नेता व गृहमंत्री निवडणूकित पिपाणी वाजवत आहेत.देशात गंभीर परिस्थिती निर्माण होत असतांना प्रचारात दंग आहेत.देश महामारीने झुंजत असतांना स्वतःच्या फायद्यासाठी देशाला विकण्याचा डाव आखला जात आहे.
देशातील अनेक शहरात कोरोना हॉटस्पॉट निर्माण झाले आहेत.मुंबई , नागपूर व पुणे येथिल आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम होत आहे.महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे.प्रशासन व सरकारी यंत्रणा आपले सर्वस्व लावून कार्य करत आहेत.तरी गंभीर स्थितीमुळे नागरिकांना बेड,व्हेटिलेटर,आँक्सिजन, रेडमेसिव्हर इंजेक्शन,वेळेवर मिळत नाही.एक वर्ष होऊनही आरोग्य यंत्रणा सक्षम करू शकलो नाही हे वास्तव आपण स्विकारले पाहिजे.डॉक्टर व नर्सेसचे अनेक पद खाली आहेत.अपुऱ्या उपचारामुळे अनेक पेशन्ट दगावत आहेत.जर अशी परिस्थिती राहली तर एप्रिलच्या शेवटी शेवटी भयावह अनागोंदी माजू शकते.

महाराष्ट्रात शासनाने विकेण्ड लॉकडाऊन लागू केला आहे.यातही राजकारण केल्या जात आहे.सत्तापक्ष व विरोधीपक्ष यांचे एकमेकांवर दोषारोपण केले जात आहे.हे महाराष्ट्राला मोठे घातक आहे.महाराष्ट्राला वाचवणे फक्त शासनाची जबाबदारी नाही तर सर्व नागरिकांची आहे.शासनाने कोणतेही राजकारण न करता आपला मूत्यु दर कमी करायला हवा.कारण दुसऱ्या लाटेत सारेच जमीनदोस्त होऊ शकताता हे विसरून चालू नये.
गृहमंत्रालयानी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करायला हवे पण तसे होतांना दिसत नाही.निवडणूक असलेल्या राज्यात गृहमंत्री व प्रधानमंत्री कोविड-१९ च्या नियमांचा फज्जा उडवत आहेत.बिनामॉस्कने व शारिरीक दुरी न ठेवता प्रचार करत आहेत.यावर निवडणूक आयोग कार्यवाही करत नाही तर बघ्याची भूमिका घेतो हे बरोबर नाही.मोठ्या नेत्यावर योग्य कार्यवाही झाली असती तर नियम लोकांनी पाळले असते. निवडणूक आयोग आज राजकारण्याच्या हातचे बाहूले झाले आहे त्यामुळे नेत्यांना आयोगाची भीती राहली नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीरता दाखवायला सुरवात केली आहे.

घरोघरी कोविड-१९ चे पेशन्ट दिसत आहेत. सरकारच्या साऱ्या उपाययोजना कमी पडत आहेत.लोकांनीही मनावर न घेतल्याने ही महामारी मोठ्या प्रमाणात पसरली आहे.नियमाचा वापर न झाल्याने आज देशाला व महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. सरकारी व खाजगी दवाखाणे कमी पडत आहेत.अशा वेळी मोठे हॉटेल व हॉल यांचे रूपांतर कोविड सेंन्टरमध्ये परावर्तित करावे लागेल. सेवानिवृत्त डॉक्टर, शिकावू डॉक्टर ,खाजगी डॉक्टर व नर्स यांची मदत घ्यावी .जर आजच आपण खबरदारी घेतली नाही तर काही काळात महाराष्ट्रातील व देशातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे सांगण्यासाठी भविष्यावेत्याची गरज नाही.

लॉकडाऊन हा कोविड-१९ वर योग्य उपाय नाही पण काही दिवसासाठी यांची गरज आहे.जे नागरिक यामध्ये प्रभावित होत आहेत अशासाठी सरकारने काही रूपये खात्यावर वळते करावे.लोकांच्या जीवनाची जबाबदारी शासनाने घ्यावी त्यासाठी जनतेने सहकार्य करावे.राजकारण्याच्या गलतथापामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली असली तरी आपण देशाचे व महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही. नव्या आव्हानासाठी साऱ्यांनी सज्ज व्हावे.
कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने देशाच्या व महाराष्ट्राच्या रूळावर आलेल्या अर्थचक्राला पुन्हा ब्रेक केले आहे. कामगार ,शेतकरी,बेरोजगार,विद्यार्थी , भटके विमुक्त,वंचित ,शोषित , घर कामगार,आकाशाखाली जीवन घालवणारे लोक,यांचे जीवन उध्दवस्त झाले आहे.जवळची होती ती पुंजी समाप्त झाली आहे.शिक्षण क्षेत्र या महामारीने प्रभावित आहे.ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी मानसशास्त्रीय दृष्ट्या कमकुवत होत आहे. खेड्यातील विद्यार्थांला अनेक समस्या येत आहेत.सातत्याने मोबाईलवर राहल्याने काही कर्मचारी व विद्यार्थी यांनी मेंदूचे ,पाठीचे व डोळ्याचे आजार होत आहेत.

कोविड-१९ च्या आजाराने सारे क्षेत्र उध्दवस्त केले आहेत.मानवच्या जीवनातील आनंदाचे सारे क्षण लृप्त केले आहेत.या वाटेतून वाचण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.देशात होणाऱ्या काळाबाजारावर व हॉस्पिटल बीलवर सरकारने नियंत्रण आणावे.रूग्णांचे होणारे शोषण थांबण्यासाठी काळाबाजारावर योग्य कार्यवाही करावी.साऱ्या भारतीय नागरिकांना लसीकरणाचा डोज द्यावा.दुःखात असणाऱ्या लोकांना पुन्हा दुःखात ढकलू नका तर त्यांना मानसिक व आर्थिक आधार द्या .सर्व भारतीयांनी किंतू परंतु सोडून देऊन या महामारीत सर्वांनी सहकार्य करावे.आपल्या भविष्यासाठी साऱ्या भेदांना गाडून टाकावे .देशाला व महाराष्ट्राला बलवान व सुदृढ करावे.आपणच प्रगतीच्या वाटा उभ्या करू शकतो हे ध्यानात ठेवा . माणूसकिची नवी आशा निर्माण करा.कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेतील वेदनेच्या कल्लोळाला समाप्त करण्यासाठी सारे लढू या . स्वतःची व इतराची काळजी घेऊन देशाला व महाराष्ट्राला वाचवू या हाच योग्य मार्ग आहे.तृर्ताश थांबतो.

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००