सामुदायीक आरोग्य अधिकारी यांना कामाच्या आधारावर मोबदला दिला जातो- डाँ. व्ही. व्ही. दुधपचारे

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.11एप्रिल):- व्रम्हपूरी तालूक्यातील 13 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रामध्ये सामुदायीक आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत.

सामुदायीक आरोग्य अधिकारी यांना ब्रम्हपूरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारच्या सेवा दयावयाच्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार दरमहा 15 कामाबर आधारीत दरमहा प्रोत्साहनपर भत्ता रु.1000/- प्रति निर्देशांक असे एकूण रु. 15000/- देय आहे.त्यामुळे कामाच्या आधारवर मोबदला दिला जातो असे प्रसिद्ध पत्राद्रारे डाँ. व्ही. व्ही. दुधपचारे तालुका आरोग्य अधिकारी ब्रम्हपुरी यांनी कळवले आहे.

सदर भत्ता हा कामावर आधारीत असल्याने कामाचे मुल्याकंन व विश्लेपन करण्याची जबाबदारी हि तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेली आहे. कामाचे मुल्यामापन करून जिल्हास्तरावर पाठविण्यात येते व त्यानूसार प्रोत्साहनपर भत्ता अदा केला जातो.

कामावर आधारीत मोबदला असल्याने ज्या सामुदायीक आरोग्य अधिकारी यांनी ज्या कामाचे उदिष्टयपूर्ती केलेली आहे. त्यानुसार प्रोत्साहनपर भत्ता अदा केलेला आहे. परंतू काही सामुदायीक आरोग्य अधिकारी यांनी उदिष्टयपूर्ती न केल्याने त्यांना त्या कामावर निरंक प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आलेला आहे. त्यामुळे उदिष्टयपूर्तीनुसार मानधन अदा करण्यांत आलेला आहे यामध्ये कुठलाही दुजाभाव केलेला नाही आणि याबाबत सामुदायीक आरोग्य अधिकारी यांना बारंबार लेखी व तोंडीसुध्दा कळविण्यात आलेले आहे.

करीता आपण प्रसिध्द केल्यानुसार सामुदायीक आरोग्य अधिकारी यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही. असे मी या पत्राद्वारे तालुका आरोग्य अधिकारी डाँ. व्ही.व्ही. दुधपचारे यांनी कळवले आहे.