रमजान महिन्यात लोडशेडिंग बंद करा – आज्जूभाई सौदागर

25

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.11एप्रिल):-मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असून या महिन्यात बांधवांना लाईट बंद च्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी तलवाडा व परिसरात सकाळच्या वेळेत करण्यात येणारी लोडशेडिंग बंद करावी अशी मागणी तलवाडा ग्रामपंचायत चे उपसरपंच आज्जूभाई सौदागर यांनी केली आहे.तलवाडा येथे सद्या पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत लोडशेडिंग सुरू आहे.

रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांना सकाळी लवकर उठून उपवासाची सुरुवात करावी लागते त्यासाठी पहाटे उठून स्वयंपाक व इतर तयारी करण्यासाठी त्यांना त्रास होऊ म्हणून सकाळची लोडशेडिंग बंद करावी अशी मागणी होत आहे, लाईट नसल्यामुळे नागरिकांना अनेक त्रासाला ही सामोरे जावे लागत आहे ,त्यामुळे रमजान महिन्यात ही लोडशेडिंग बंद करावी अशी मागणी उपसरपंच आज्जूभाई सौदागर यांनी केली आहे