कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर यांची नियम बाहय वाळू उपसा प्रकरणी १ कोटी ५५ लाख रुपयांची धाडसी कारवाई

33

🔹महसुल प्रशासन यांची बघ्याची भूमिका

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.12एप्रिल):-गोदावरी नदी च्या वाळुला मोठ्या प्रमाणात मागणी आसल्यामुळे या ठिकाणी वाळु साठे ठेकेदार शासनाचे नियम धाब्यावर बसवून गोदा पात्रातील वाळू मजुरा द्वारे ट्रॅक्टर मध्ये भरायची व वाहतूक करण्याचा नियम आहे पन तालुक्यातील भाबंरवाडी वाळु साठयावर दि. ६ एप्रिल रोजी गुप्त माहित मिळाली की जे सी बी मसीन च्या साह्याने हायवा मध्ये भरत आसल्याची माहीती गंगाखेड पोलीस ठाण्याच्या कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर यांना मिळाली.

या नुसार दि ९ एप्रिल रोजी सायंकाळी त्या आपल्या फोज फाटया सह खाजगी वाहनाने पोहचल्या या ठिकाणी त्यांना गाडी च्या प्रकाशाने ४ ते ५ हायवा दुसलगाव शिवारात गोदा काठावरून पळुन जात आसताना दिसल्या मुळी शिवारात गोदा काठी ऐक जेसीबी मसीन उभी व दुसरी मसीन नदी पात्रातून तात्काळ आनुन उभी आसलेल्या मसीन जवळ लावून चालक अंधारात पळुन गेला सदरील वाळु धक्क्यावर पहाणी केली आसता दोन मोठे पोकलेनड व ऐक जेसीबी मसीन व वाळु चा मोठा ढिगारा दिसुन आला.

याची किमंत १कोटी ५५लाख रुपये वाळुसह साहीत्य जप्त. या ठिकाणी पोलीस शिपाई याला थांबून आधीक पहाणी करण्यासाठी नदी पात्रात बनवलेल्या कृत्रिम वाळु व मातीच्या बांधावरुन दुसलगाव शिवारात नदी काठी मातीच्या ढिगाऱ्याचया आडोशाला ऐक जेसीबी मसीन आढळून आली सदरील मसीन ताब्यात घेऊन पोलीस शिपाई याच्या सोबत पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली पुढे पहाणी करीत आसताना मोकळ्या जागेत शेतामध्ये मोठा वाळु चा ढिगारा आढळून आला पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर यांनी तातकाळ उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना माहिती दिली त्यांनी तहसीलदार यांना पाठवतो म्हणून सांगितले त्यावरुन दुसलगाव येथील दोन पंचांना येण्यास सांगितले.

गाडी च्याप्रकाशात पहाणी करत आसताना संदीप वाळके व कालु भाई त्या ठिकाणी आले त्यांनी हा वाळु धक्का भाबंरवाडी चा आहे धक्क्याचे कागद पत्रे झेरॉक्स प्रती दिल्या पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर यांनी त्यांना येथुन जाण्यास सांगितले ते दोघे तिथुन निघून गेले पुन्हा आधीक पहाणी केली आसता या ठिकाणी ऐक टुटेन मसीन व ऐक जेसीबी मसीन उभी आसलेली आढळून आली मुळी शिवारात गोदा काठी पोलीस फोज फाटा आला आसताना यांच्या पाठीमागे कालु भाई संदीप वाळके आळनुरे वकील राजु खान मोहम्मद खान ओंकार शहाणे मंजुर ऐ ई लाही उर्फ राजु व ईतर तिन तिथे येऊन भाबंरवाडी चा धक्का आहे आम्ही घेतलेला आहे आसे सांगितले पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर यांनी त्यांना येथुन जाण्यास सांगितले तिन वेग वेगळ्या ठिकाणच्या वाळु साठयाचया व साहित्याचा पंचनामा करून सदरील ठिकाणी आढळून आलेल्या मसीन स्थान बद करण्यात आल्या.

दोनशे ब्रास वाळु साठे प्रतेकी तिन हजार रुपये प्रमाणे ऐशी लाखाची मशनेरी जप्त करण्यात आल्या आहेत तर या प्रकरणी नऊ जनावर भादवी गु र न ११८ कलम ३७९.४३०.४३१.३२.४८. (७) ४८ (८) १५.२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून या कार्यवाही मुळे वाळु ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत तर महसुल प्रशासनातील वरीष्ठ आधीकारी या कडे का दुर्लक्ष करीत आहेत तर गोदा काठावरील शेतकरी सर्वसामान्य नागरिक पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर व त्यांच्या पथकातील कर्म चाऱ्याचे आभार मानत आहेत. याचा तपास सपोनि. बालाजी गायकवाड करत आहेत.