बळसाणे येथे तहसीलदार चव्हाणके यांनी दिली भेट ग्रामपंचायतचे केले कौतुक

🔸बळसाणे येथे तहसीलदार चव्हाणके यांनी दिली भेट ग्रामपंचायतचे केले कौतुक

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

निजामपूर(दि.13एप्रिल):- माळमाथा भागातील बळसाणे गावात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी ८ रोजी ग्रामपंचायतीत भेट दिली. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्या कडून कोव्हिड संदर्भात माहिती घेत तहसीलदार चव्हाणके यांनी गावात कोव्हिड चे एक ही रुग्ण नसल्याचे समाधान व्यक्त केले. तरीही गावात जंतुनाशक फवारणी वारंवार करत चला, गावातील रिकाम्या टेकड्यांना फिरू देवू नका, किराणा दुकानदाराकडे गर्दी होता कामा नये. अशा बारीकसारीक गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याच्या सुचना तहसीलदार चव्हाणके यांनी दिल्या दरम्यान लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे पुढे म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत कोव्हिड चे एक ही रुग्ण नसल्याची ग्वाही सरपंच गिरासे यांनी दिली.

राज्यासह जिल्ह्यात कोव्हिड चा वाढता प्रादुर्भाव पाहता माझी ग्रामपंचायत टिम पुढील उपाययोजना साठी सक्रीय असल्याचे गिरासे यांनी सांगितले.गावात पंधराव्या वित्त आयोगातून निर्जंतुकीकरण करण्यासाठी नव्याने फवारणी मशीन आणले काही दिवसांनी गावातील गल्लीबोळात साँनिटायझर चा वापर करित निर्जंतुकीकरण करणार आहोत. गावात घरोघरी जाऊन सर्व्हे करणाऱ्या आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व प्राथमिक शालेय शिक्षिका या कोरोना योध्दांकरिता तसेच त्यांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून आँक्सीमिटर ७, तापमापक ७, मास्क ४०००, हँडवाँश १० व साँनिटायझर चे कँन गावातील आरोग्य उपकेंद्राला भेट देण्यात आले. गावात निर्जंतुकीकरणासाठी सोडियम क्लोराईड चे ५ लिटराप्रमाणे १०० कँन घेतल्या चे सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी बैठकी दरम्यान सांगितले यापुढे उपसरपंच महावीर जैन म्हणाले की सध्या लोकांची भिती संपत नाही. यासाठी सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आपल्या दारी या मोहिमेला लवकरच आम्ही सुरुवात करणार आहोत.

जेणे करून आपल्या दारावर डाँक्टर भाऊ आल्याचे खात्री करत रुग्ण उपचार करेल, अनेक रुग्ण आर्थिक परिस्थिती अभावी रुग्णालयात जाणे टाळत असतात. तोपर्यंत आजाराचे लक्षण वाढत जातो. म्हणून असा प्रसंग कुणावरही येऊ नये, याकारणाने डाँक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याचे संकल्पना केली आहे. तसेच योग्य वेळी योग्य उपचार व औषध ही दिले जाईल, दरम्यान बळसाणे, कढरे, आगरपाडा व सतमाने हे गाव लोकसंख्या च्या मानाने बऱ्यापैकी आहे. आणि दुसाणे येथील आरोग्य केंद्रात नागरिकांना लसीकरणासाठी जाणे शक्य होत नाही. तर लोक लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून आपण बळसाणे गावासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती जैन यांनी केली, तसेच तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी पुर्ण माहिती घेत ग्रामपंचायतीच्या उपाययोजना चे कौतुक करीत समाधान व्यक्त केले.

 

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED