मोताळा नगरपंचायत अंतर्गत 1 कोटी रुपयाच्या कामाचे भूमिपूजन

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मोताळा(दि.13एप्रिल):- नगरपंचायत अंतर्गत जवळपास एक कोटी रुपयाच्या कामाच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम माननिय आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला——- मोताळा नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक 14,15,16,17 या प्रभागांमधील सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन माननिय आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी केले. मोताळा नगरपंचायत मध्ये आपण दोन कोटी रुपयाची विकास कामे मंजूर करून त्वरित सुरू करू असे आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी सांगितले होते, आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी मोताळा येथील पत्रकार परषदे तील आपल्या वचनाची पूर्तता करत 9/4/2021 रोजी एक कोटी रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन केले.

याप्रसंगी बोलताना आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी सांगितले कि मोताळा शहरामध्ये लवकरच विकास कामाचा पुढचा टप्पा सुद्धा सुरू केल्या जाईल तसेच त्याकरिता जवळपास 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणू असेही त्यांनी यावेळी सांगितले,यामध्ये शहरांमधील ओपन स्पेस सौंदर्यीकरण तसेच अनेक मूलभूत सुविधांचा समावेश असून आपण मोताळा शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे त्यांनी संबंधित सर्व कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घ्यावी अशा सुद्धा सूचना कंत्राटदाराला दिल्या, आमदार संजू भाऊ गायकवाड यांनी इतका मोठा निधी मोताळा शहराला दिल्यामुळे कार्यकर्त्या व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी याबद्दल माननिय आमदार संजू भाऊ गायकवाड यांचे आभार मानले, तेव्हा त्यांच्या सोबत उप जिल्हा प्रमुख भोजराज पाटील, शिवसेना नेते बाळा भाऊ नारखेडे, नितीन सुपे तसेच सर्व शिवसेना व युवासेना पदाधिकारी, मा नगराध्यक्ष, मा नगरपंचायत उपाध्यक्ष तसेच नगरसेवक व कार्यकर्ते हजर होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED