आमदार समीर कुणावार यांनी घेतला कोरोना महामारी चा आढावा

24

🔹आय. एम. ए. ने दिला सहकार्याचा हात

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.14एप्रिल):-कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता आमदार समीरभाऊ कुणावार यांनी तातडीने यांच्या अध्यक्षतेखाली आज हिंगणघाट तालुक्याचा कोरोणा आढावा बैठक आमदार कार्यालय हिंगणघाट येथे घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये कोरोना ग्रस्तांचा औषधोपचार त्याच प्रमाणे कंटेनमेंट झोन याबद्दल माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजना करणे, टेस्ट करून घेणे जे पेशंट कोरोना ग्रस्त आहे गृह विलगीकरनात आहे, त्यांची प्रकृती वाढत असल्यास त्यांची माहिती घेऊन त्यावर ताबडतोब औषध उपचार करण्याची दखल घेणे या सर्व गोष्टीचा आढावा सदर बैठकीमध्ये घेण्यात आला.

दिवसें दिवस कोरोणाचे संक्रमण वाढतच चालले असून हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेशंट दिसून आलेले आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन *आमदार समीरभाऊ कुणावार* यांनी केले. सदर कोरोना पहिल्यापेक्षाही मोठ्या झपाट्याने वाढत चालला असून उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोविंड सेंटर चालविणे गरजेचे आहे . हिंगणघाट शहरातील आय. एम. ए. चे सर्व डॉक्टर यांची मिटिंग घेऊन सर्व डॉक्टरांनी सहकार्य देण्यास प्राधान्य दिले. आय. एम. ए. च्या सर्व डॉक्टरांनी तीन शिफ्ट मध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे शहरात वाढत्या कोरोना वर निर्बंध निश्चितच लाभेल असा विश्वास *आमदार समीरभाऊ कुणावार* यांनी व्यक्त केला.

सदर बैठकीला *आय. एम. ए. च्या अध्यक्षा डॉ. सौ. मानधनीया मॅडम, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन मा. श्री. सचिनजी तडस साहेब, हिंगणघाट उप-जिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी डॉ. मिसाळ मॅडम, हिंगणघाट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. किर्तीताई कुचेवार, इत्यादी हिंगणघाट शहरातील डॉक्टरांची चमू सोबतच हिंगणघाट शहराचे मुख्याधिकारी मा. श्री. जगताप साहेब* सदर बैठकीला उपस्थित होते.