उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड याठिकाणी DCAC. व ICU. विभाग सुरू करण्याची नगरसेवकांची मागणी

26

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.14एप्रिल):- शहरासह तालुक्यामध्ये कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोविड बाधित रुग्णांची हेळसांड होऊनये यासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणीच DCAC. व ICU.डी. विभाग सुरू करण्याची मागणी गंगाखेड येथील काही नगरसेवकांनी परभणी जिल्हाधिकारी यांना 13 एप्रिल रोजी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

गंगाखेड तालुका हा परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून कोविड रुग्णांसाठी या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. कोविड बाधित रुग्णांना परभणी याठिकाणी हलवण्यात येते. या दरम्यान बाधित रुग्णांची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नऊ तालुक्यातून परभणी जिल्ह्यातच मोठ्याप्रमाणात कोविडचे रुग्ण जात असल्याने जिल्हा रुग्णालय या ठिकाणी अतिरिक्त भार पडत आहे. या रुग्णांची विभागणी होण्यासाठी व काम चांगले पद्धतीने पार पाडण्यासाठी गंगाखेड याठिकाणी DCAC. व ICU. विभाग सुरू करण्याची मागणी नगरसेवक चंद्रकांत खंदारे सभापती आरोग्य व स्वच्छता, नागनाथ कासले व तुकाराम दांदळे यांनी केली आहे.