खेरवाडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रामपंचायतीच्या वतीने 130 वी जयंती

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.15एप्रिल):- जिल्हा निफाड तालुका खेरवाडी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरूना विषाणू त्या पार्श्वभूमीवर डिस्टन्स चे पालन करून साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे प्रतिमापूजन खेरवाडी सरपंच प्रतिनिधी दीपक भाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामपालिका सदस्य एडवोकेट संदीप पवार व सुभाष आवारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले व सर्व ग्रामपालिका सदस्य च्या वतीने बुद्ध वंदना घेऊन मानवंदना देण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सतीश भाऊ संगमनेरे व सुभाष आवारे यांनी तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन मेणबत्ती पेटवून अगरबत्ती धूप लावून मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश भाऊ पगारे यांनी केले तर आभार पत्रकार विजय केदारे यांनी यांनी मानले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गोरख पगारे माजी सरपंच विजयाबाई पगारे ,चंद्रकला केदारे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी खेरवाडी सरपंच प्रतिनिधी दीपक जाधव सदस्य एडवोकेट संदीप पवार, उमेश पगारे, अरुण संगमनेरे कृष्णा लांडगे गणेश लांडगे पप्पू उगले, सुभाष आवारे, काशी श्वर, संगमनेरे, सतिष संगमनेरे नयन केदारे पत्रकार विजय केदारे, दिनकर आवारे ‘संजय संगमनेरे आदी उपस्थित होते .

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED