बाबासाहेबांच्या जन्मदिनी सॅनटाईझर फवारणी करून आदरांजली

18

🔸महात्मा फुले ब्रिगेड व संत सावता माळी युवक संघ धरणगाव यांचा अनोखा उपक्रम…

✒️धरणगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धरणगांव(दि.15एप्रिल):– १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आणि संत सावता माळी युवक संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव नगरपालिका कडून टँकर सॅनिटायझर फवारणी मोठा माळीवाडा परिसर येथे सॅनिटायझर घरोघरी करण्यात आले. covid-19 चा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी एक प्रयत्नशील प्रयत्न करण्यात आले.

याप्रसंगी महात्मा फुले ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष नरेंद्र (राजु )महाजन, सावता माळी युवक संघाचे तालुकाध्यक्ष निलेश महाजन,शहर अध्यक्ष योगेश पाटील महात्मा फुले ब्रिगेड युवक जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, सचिव नितेश महाजन, विकी महाजन, विशाल माळी,आबा माळी, विनोद माळी यांनी स्वतः घरोघरी सॅनिटायझर केले.आणि तसेच प्रभाग क्र. १ नगरसेविका सौ.सुरेखाताई विजय महाजन यांचे अनमोल सहकार्य लाभले.महामानवांच्या जन्मदिनी सामाजिक कार्य करून आदरांजली वाहण्यात आली.