डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त केले रक्तदान

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.15एप्रिल):-संपूर्ण देशात आज कोरोना या रोगाचा वातावरण असतांना, सरकारने राष्ट्रीय सण, जयंती साधे पणाने साजरे करण्याचे लोकांना आव्हान केले होते. हीच बाब लक्षात घेता, काल विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लाईफ फाऊंडेशन ब्रम्हपुरी या सामाजिक संस्थेच्या सदस्याने एका गरजू व्यक्तीला रक्तदान करून बाबसाहेबांना मानवंदना दिली आहे.

सदर राक्तदाते यांचे नाव राहुल सुरेश शेंडे (वय 25) असून, ते पवनी तालुक्यातील सावरला या रहिवासी आहेत..यांनी ब्राम्हपुरीतील डॉ.सावजी हॉस्पिटल मध्ये भरती असलेल्या एका महिला रुग्णाला रक्तदान करीत, मदत केलेली आहे. आणि आजवर त्यांनी 5वेळा रक्तदान केले आहे, हेच विशेष.