डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्वराज्य फाऊंडेशन ची संत गाडगे बाबा बालगृहाश्रमाला भेट

22

🔸शिव स्वराज्य फाऊंडेशन दर्यापूर तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व अल्पआहाराचे वितरण

✒️दर्यापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

दर्यापूर(दि.16एप्रिल):- भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दर्यापूर येथील शिव स्वराज्य फाऊंडेशन यांच्या द्वारे बाबासाहेबांची जयंती ही दर्यापुर स्थित संत गाडगे बाबा बालगृह आश्रमात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेद्वारे फ़ळवाटप तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही यावेळी करण्यात आले.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टनसिंग तसेच कोरोनापासून बचावासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैली संदर्भात संस्थेच्या समन्वयकानी अनाथालयांच्या मूलांशी गप्पा मारल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र केकान, उपाध्यक्ष प्राजक्ता शंके, सचिव सागर ठाकरे, सहसचिव आदेश वाघमारे, कोषाध्द्यक्ष प्रतीक्षा गावंडे, सदस्य मुकेश सुर्यवंशी, सदस्य पायल शांके, सदस्य वैशाली किशनराव दंडे, तसेच संजय शंके, श्री शंके इत्यादी उपस्थित होते. यावेळी संत गाडगे बाबा बाल गृहाश्रमाचे प्रमुख गजानन देशमुख, रितिका गजानन देशमुख यांनी सहकार्य केले.