नाभिक बांधवांवरील पोलीसां करवी होणारी जीवघेणी मारहाण सरकारने तात्काळ रोखावी– वंचीत बहूजन आघाडी

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.18एप्रिल):-पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली होणाऱ्या जीवघेण्या अमानुष मारहाणीच्या घटणेनी समस्त नाभिक समाज बांधव भयग्रस्त झाले आहेत.औरंगाबाद येथील घटना पोलीस प्रशासन सरकारच्या नियंत्रणा बाहेर गेल्याचे प्रमाण आहे. घटना स्थळावर मृत्यू येईस्तोवर मारहाणीच्या ह्रदय हेलावून सोडणाऱ्या घटनेचे दूखद पडसाद महाराष्ट्र भर उमटले आहे.वंचीत बहूजन आघाडी यवतमाळ जिल्हा ह्या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे.

लाॅकडाऊन काळात नाभिक बांधव कूटूबांच्या ऊदरनिर्वाहाचे चिंतेने सर्वाधिक प्रभावित झाले असतांना. जिवन जगण्याच्या संघर्षात ऊपासमारीच्या संकटाचा सामना करणे कठीण झाल्याने आत्महत्या करीत आधीच आपले जिवन संपवित आहेत आघाडी सरकार त्यांना मदतीचा हात न देता पोलीसांकरवी जिवघेण्या मारहाणीत क्रूर हत्या करीत आहेत. शासनाने नाभिक बांधवांवरील पोलीसांकरवी होत असलेल्या अमानुष मारहाणीच्या घटना तात्काळ रोखाव्यात आणि नाभिक कूटूंबाना दरमहा दहा हजार रूपये सानुग्रह मदत करावी.

औरंगाबाद येथील नाभिक बांधवाचा पोलीस मारहाणीत घटनास्थळी मृत्यू झाला .त्याचे कूटूंबियांवर कर्ता माणूस गेल्याने जो आघात झाला त्यासाठी किमान दहा लाख रूपये आर्थिक मदत द्यावी तसेच ह्या क्रूरता पूर्ण पोलीस मारहाणीच्या घटनेची ऊच्च स्तरिय चौकशी करून जबाबदार पोलीस कर्मचारी/अधिका-यावर भा.द.वि. चे कलम 304 अन्वये सदोष मनुष्य वधाचे गुन्हे नोंदवावे. ही मागणी यवतमाळ जिल्हा वंचीत बहुजन आघाडी (पूर्व )चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, कार्याध्यक्ष रणधीर भाऊ खोब्रागडे, ऊपाध्यक्ष मंगल तेलंग, शैलेश भानवे, महासचिव ॲड.श्याम खंडारे, सचीव दिलीप भाऊ बनकर ,कोषाध्यक्ष अरूणराव कपीले,कायदेशीर सल्लागार विप्लव तेलतूंबडे, संघटक सुभाषराव लसंते, का.सदस्य चिंतामण वाघाडे आदि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवदास कांबळे ह्यांनी कळविले आहे. . . ~~~~~~~~~~~~~~~~~~

महाराष्ट्र, यवतमाळ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED