चंद्रपूर जिल्ह्यात (दि.18एप्रिल) रोजी 24 तासात 547 कोरोनामुक्त 1584 कोरोना पॉझिटिव्ह – 25 कोरोना बधितांचा मृत्यू

    39

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    चंद्रपूर(दि.18एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 547 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1584 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 25 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 42 हजार 231 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 30 हजार 650 झाली आहे. सध्या 10 हजार 981 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 29 हजार 846 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 80 हजार 149 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

    आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या तुकुम येथील 47 वर्षीय व 63 वर्षीय पुरुष, दाताळा येथील 58 वर्षीय महिला, गंज वार्ड येथील 68 वर्षीय पुरुष, बियाणी नगर येथील 52 वर्षीय महिला, इंदिरानगर येथील 65 वर्षीय महिला, सिद्धार्थ वार्ड वरोरा येथील 62 वर्षीय पुरुष, बागदेवाडी भद्रावती येथील 50 वर्षीय पुरुष, घोडपेठ भद्रावती येथील 70 वर्षीय पुरुष, नागभीड येथील 52 वर्षीय महिला, तळोधी नागभिड येथील 53 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 60 वर्षीय महिला, चिमूर येथील 83 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 55 व 37 वर्षीय पुरुष, चननखेडा भद्रावती येथील 75 वर्षीय पुरुष, झाडे प्लॉट भद्रावती येथील 70 वर्षीय पुरुष, लाखांदूर भंडारा येथील 40 वर्षीय महिला, वडाला पायखू ता. चिमूर येथील 72 वर्षीय महिला, गोंडसावरी चिचपल्ली येथील 35 वर्षीय महिला, नागभिड येथील 82 वर्षीय पुरुष, लोन वाही तालुका सिंदेवाही येथील 51वर्षीय महिला, तपाल ता. ब्रह्मपुरी येथील 30 वर्षीय पुरुष, बोंडेगाव ब्रह्मपुरी येथील 42 वर्षीय पुरुष, वार्ड नंबर 15, मुल येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

    जिल्ह्यात आतापर्यंत 600 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 551, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा दोन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.आज बाधीत आलेल्या 1584 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 495, चंद्रपूर तालुका 67, बल्लारपूर 96, भद्रावती 124, ब्रम्हपुरी 240, नागभिड 27, सिंदेवाही 17, मूल 55, सावली 22, पोंभूर्णा 5, गोंडपिपरी 7, राजूरा 61, चिमूर 173, वरोरा 140, कोरपना 28, जीवती 5 व इतर ठिकाणच्या 22 रुग्णांचा समावेश आहे.

    नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

    ?गडचिरोली जिल्ह्यात तेरा मृत्यूसह आज(18 एप्रिल) 524 नवीन कोरोना बाधित तर 226 कोरोनामुक्त

    गडचिरोली(दि.18एप्रिल):- आज जिल्हयात 524 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 226 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 15009 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11692 वर पोहचली. तसेच सद्या 3104 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 213 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

    आज 13 नवीन मृत्यूमध्ये रा. नवेगाव गडचिरेाली येथील 72 वर्षीय पुरुष, ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 58 वर्षीय पुरुष, रा. रामनगर गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, ता. लाखांदुर जि. भंडारा येथील 58 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 62 वर्षीय पुरुष, रा. स्नेहानगर, गडचिरोली येथील 50 वर्षीय महिला, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 69 वर्षीय पुरुष, ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 62 वर्षीय पुरुष, ता. कोरची जि. गडचिरोली येथील 45 वर्षीय पुरुष, ता. पवनी जि. भंडारा येथील 65 वर्षीय पुरुष, रा. सर्वोदय वार्ड गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 57 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.90 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 20.68 टक्के तर मृत्यू दर 1.42 टक्के झाला.

    नवीन 524 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 169, अहेरी तालुक्यातील 34, आरमोरी 38, भामरागड तालुक्यातील 19, चामोर्शी तालुक्यातील 30, धानोरा तालुक्यातील 27, एटापल्ली तालुक्यातील 16, कोरची तालुक्यातील 30, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 39, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 14, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 30 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 88 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 226 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 114, अहेरी 11, आरमोरी 16, भामरागड 17, चामोर्शी 15, धानोरा 5, एटापल्ली 9, मुलचेरा 3, सिरोंचा 1, कोरची 11, कुरखेडा 13, तसेच वडसा येथील 11 जणांचा समावेश आहे.