मध्यरात्री घडलेल्या खुनाच्या थरारक घटनेत दोघांचा खून तर सहा जण गंभीर जखमी

31

🔺मावसा व काकाचा खून तर आई बहिणीसह इतर नातेवाईक जखमी

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

पुसद(दि.20एप्रिल):-पासुन जवळच असलेले कारला देवस्थान येथे आपल्या आई बहिणीवर कुर्‍हाडीने वारकरुन शेजारी राहणाऱ्या सहा नातेवाईकावर मध्यरात्री झोपेत असणार्‍यांवर कुर्‍हाडीने वार करून जीवघेणा हल्ला करीत आपल्या मावसा व काकाचा खून केल्याच्या घटनेतील आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेऊन पुढील तपासास सुरुवात करीत आहेत,
पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण अंतर्गत येत असलेल्या कारला येथील रहिवासी आरोपी गोकुळ विलास राठोड याने 18 एप्रिल ते 19 एप्रिल च्या मध्यरात्री दरम्यान आई सुनिता विलास राठोड वय 35 वर्षे यांच्यासह बहिण अश्विनी विलास राठोड वय वर्ष 17 हिचे हिचेसह शेजारी असलेल्या नातेवाईकांवर सुद्धा कुर्‍हाडीने झोपेतच वार केले.

त्यामध्ये मेरचंद शाम आडे वय 60 वर्ष व वसंता जेता राठोड वय 65 वर्ष यांचा जागीच खून झाला तर संजय जेता राठोड 45 वर्ष याच्यावर कुर्‍हाडीने वार केल्याने डोक्याला, कानाजवळ आणि उजव्या हाताला जखम झाली आहे तर आरोपीने अश्विनी विलास राठोड वय वर्ष 17 हिचे वर सुद्धा कुर्‍हाडीने वार केल्याने त्या गंभीर अवस्थेत आहेत तसेच सुनिता विलास राठोड वय 35 वर्षे हिच्यावर सुद्धा आरोपी गुलाब ने कुर्‍हाडीने कानावर व मानेवर वार करून जखमी केले त्यासोबतच यशोदा उमेश जाधव वय 45 वर्षीय महिलेवर आरोपी गुलाब राठोड याने कुर्‍हाडीने डोक्यात, चेहर्‍यावर आणि उजव्या हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच गणेश आनंदा जाधव वय पन्नास वर्ष याचे गळ्यावर आणि डोक्यात मारून जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा थरार आणणारी घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे आणि या पोलिस स्टेशन पुसद ग्रामीण अंतर्गत येत असलेल्या कारला ग्रामपंचायतच्या मागील बाजूस असलेल्या तांडा वस्ती मध्ये हा थरारक घटना घडल्याची माहिती कळताच गावकरी तथा नातेवाइकांनी एकच गर्दी केली होती या ठिकाणी नातेवाईकांनी रडण्याचा एकच टाहो केला होता.

मध्यरात्री दरम्यान आरोपी गुलाब राठोड हा हातामध्ये कुऱ्हाड घेऊन एकापाठोपाठ एक झोपेत असलेल्यांना कुर्‍हाडीने जीवाने मारण्याच्या उद्देशाने वार करत असताना नामदेव राठोड यावर वार करीत असताना गुलाब राठोड यास नामदेवने हिमतीने पकडून रोखले त्यामध्ये नामदेव च्या हाताला व पाठीवर जखम झाली आहे तर होणाऱ्या घटनेस रोखण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर सर्वांनी मिळून त्यास बांधून ठेवले आणि त्याबाबतची माहिती पोलिस स्टेशन पुसद ग्रामीण येथे दिली त्यानुसार पोलिस स्टेशन पुसद ग्रामीणचे ठाणेदार बोडखे हे आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले याठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन तथा गावचे सरपंच, पोलिस पाटील सर्व सदस्य गणांसह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.