बागपिंरळगाव ते सावरगाव रस्ता कामात ड्रिम कन्ट्रक्शनच्या हालगर्जीमुळे आपघात घडु लागले

30

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.20एप्रिल):-पासून जवळ च आसलेल्या गोळेगाव जवळ रस्ता पुलाचे काम चालु असुन दिं 18/4/२०२१रोजी रात्री 9.30 सुमारास टाकरवण कडुन गेवराई कडे जाणा-या दुचाकीचा पुलाच्या कामाच्या आती निष्काळजीपनामुळे आपघात घडल्याने एका तरुणास जागेवरच जिव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. बागपिंरळगाव ते सावरगाव या डांबरी रस्ता कामाला दिड दोन वर्षा पासुन सुरुवात झालेली असुन हे काम ड्रम कन्ट्रक्शनच्या माध्यमातुन सुरु आसल्याचे बोलले जाते.

ड्रिम कन्ट्रक्शनने हे काम हाती घेतल्या पासुन ते आज पर्यंत या रस्ता कामावर वेळो वेळी निष्काळजी पणा सातत्याने दिसुन येत असुन या कन्ट्रक्शनच्या वेग वेगळ्या हेड व्दारे नाली,पुल, व रस्ता काम सुरु आसल्याने कामाच्या देखरेखीत निष्काळजी होऊन पुलाच्या कामावर काम सुरु आसल्याचे फलक नसने आस्या आणेक तुर्टी पुलाच्या कामात घटनेच्या ठिकाणी दिसुन आसल्याचे प्रतेकदर्शी कडुन सांगण्यात येत असुन ड्रिमकन्ट्रशन कडुन थोडी दक्षता घेन्यात आली आसतीतर हा आपघात टाळला जाऊ शकला आसता आसे प्रतेकदर्शी नागरिकांनी बोलुन दाखवले असुन या पुढे तरी ड्रिमकन्ट्रशचे पदाधिकारी दक्षता घेतील का आसा प्रश्न या आपघाताच्या निम्मीताने उपस्थिति होत आहे.