हिंगणघाट शहरात दहा दिवसांत कोरोना प्रार्दुभावाचा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३४ व्यक्तिवर नगरपरिषदन ठोठावला १ लाख ७६ हजार रुपये दंड

25

✒️इकबाल पैलवान(वर्धा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-९९२३४५१८४१

हिंगणघाट(दि.21एप्रिल):- शहरात दिवसें दिवस वाढत चालल्या कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणाजी देशभ्रात यांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधी प्रशासानाला दिले आहे याचं अनुषंगाने हिंगणघाट नगरपरिषदेच्या कोरोना नियंत्रण पथकाने अशाच विविध पध्दतीने कोरोना नियंत्रण पथकाने दहा दिवसांत नियमांचे उल्लघंन करणाऱ्या १३४ व्यक्तिवर दंडात्मक कार्यवाही करीत १लाख ७६ हजार रूपये दंड वसुल केला आहे.

हि कारवाई हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी चंद्रभानजी खंडाईत , तहसिलदार श्रीरामजी मुंदडा ठाणेदार संपतजी चव्हान, नगरपरीषद मुख्याधिकारी अनिल जगताप यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस विभागाचे कर्मचारी रवि वानखेडे, महसूल विभागाचे नायब तहसिलदार. शमंशेर पठाण, हेमनेजी तलाठी घवघवे, नगरपरीषद विभागाचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत पाटील,सुरेश आडेपवार,रऊफ खाॅॅन , महेन्र्द नक्के,राजेश मोरे, संजय गिरडकर,बालू गेडाम,सुमेध पाटील,अनिल झाडे,किशोर कुमरे,चेतन भोयर सह पोलीस, महसूल नगरपरीषद अधिकारी कर्मचारी संयुक्तपणे करीत आहे