कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला,लोहा तालुक्यातील 35 गावांच्या सीमा बंद

27

✒️लोहा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

लोहा(दि.22एप्रिल):-ग्रामीण भागात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला असल्या कारणांमुळे, अनेकांना ताप,सर्दी, अंगदुखी असे कोरोणा सदृश्य लक्षणे असतानासुद्धा ती अंगावर काढत आहेत. लोहा तालुक्यातील जवळपास 35 गावांच्या सीमा अती तात्काळ बंद करण्याचे आदेश धडकल्याने ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.

यात तालुक्यातील आष्टुर, माळाकोळी,रिसनगाव, दापशेड, कारेगाव,निळा,पेनुर,धावरी, भेंडेगाव, हाडोळी, सोनखेड,पिंपळगाव ढगे, मंगरूळ,सावरगाव( न.), शेलगाव(धा.)पारडी,आडगाव,शेवडी(बा),टेळकी,बेटसांगवी,जवळा(दे),बामणी,मस्की, सुनेगाव, धानोरा (म.),आजमवाडी,गोळेगाव, जोमेगाव जानापुरी,सोनमांजरी, पोखरभोसी,वडगाव या गावातील रुग्ण संख्येचे व वाढते प्रमाण पाहता तसेच अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह असताना सुद्धा मोकाट फिरून स्वतःला कुटुंबाला, गावातील व्यक्तिंना नकळत यांचा संसर्ग होत आहे.

याकरिता विषाणू चा covid-19 संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावे सीलबंद करण्यात येत आहेत.गावातील समीतीचा अध्यक्ष सरपंच,ग्रामसेवक सचिव, सदस्य तलाठी, पोलीस पाटील, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, बी एल ओ यांच्यामार्फत समितीद्वारे गावात कोरोणा चा प्रसार रोखण्यासाठी,प्रभावीपणे कमी करण्यासाठी उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका दंडाधिकारी यांनी आदेशित केलेले आहे.