चंद्रपूर जिल्ह्यात (दि.24एप्रिल) रोजी 24 तासात 1133 कोरोनामुक्त, 1618 कोरोना पॉझिटिव्ह तर 21 कोरोना बधितांचा मृत्यू

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24एप्रिल):-जिल्ह्यात मागील 24 तासात 1133 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1618 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 51 हजार 112 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 35 हजार 712 झाली आहे. सध्या 14 हजार 646 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 53 हजार 72 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 95 हजार 807 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 45 व 39 वर्षीय पुरुष, भिवापुर येथील 67 वर्षीय महिला, गोपाल पुरी येथील 61 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष.
मूल तालुक्यातील 38 व 53 वर्षीय पुरुष.
वरोरा तालुक्यातील 58 व 78 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, सरदार पटेल वार्ड येथील 64 वर्षीय महिला.
गोंडपिपरी तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष.
ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय महिला .नागभीड तालुक्‍यातील 55 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 43 वर्षीय महिला 65‌ व 70 वर्षीय, सावरगाव येथील 36 वर्षीय पुरुष. लाखांदूर येथील 65 वर्षीय महिला.बल्लारपूर येथील 80 वर्षीय पुरुष.भद्रावती येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 754 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 696, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 25, यवतमाळ 22, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1618 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 587, चंद्रपूर तालुका 140, बल्लारपूर 101, भद्रावती 100, ब्रम्हपुरी 106, नागभिड 77, सिंदेवाही 19, मूल 30, सावली 32, पोंभूर्णा 37, गोंडपिपरी 12, राजूरा 36, चिमूर 50, वरोरा 172, कोरपना 89, जिवती 16 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

🔺गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह आज(24 एप्रिल) 571 नवीन कोरोना बाधित तर 319 कोरोनामुक्त

गडचिरोली(दि.24एप्रिल):- आज जिल्हयात 571 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 319 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 18004 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 13375 वर पोहचली. तसेच सद्या 4318 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 311 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

आज 16 नवीन मृत्यूमध्ये 89 वर्षीय पुरुष ता सावली जि.चंद्रपुर, 42 वर्षीय पुरुष आरमोरी , 35 वर्षीय पुरुष वडसा, 42 वर्षीय पुरुष धानोरा, 65 वर्षीय पुरुष अनकोडा चामोर्शी , 55 वर्षीय पुरुष कोरची ,46 वर्षीय पुरुष बजरंगनगर गडचिरोली , 35 वर्षीय पुरुष गोगाव अडपल्ली जि. गडचिरोली , 44 वर्षीय पुरुष ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर ,52 वर्षीय महिला राजुरा जि.चंद्रपुर , 42 वर्षीय पुरुष छिंदवाडा मंध्ये प्रदेश , 50 वर्षीय महिला बोटेकसा ता. कोरची , 51 वर्षीय पुरुष गडचिरोली, 40 वर्षीय पुरुष वडसा , 65 वर्षीय पुरुष चातगाव ता.धानोरा, 71 वर्षीय पुरुष आरमोरी जि. गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 23.98 टक्के तर मृत्यू दर 1.73 टक्के झाला.

नवीन 571 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 180, अहेरी तालुक्यातील 52, आरमोरी 25, भामरागड तालुक्यातील 29, चामोर्शी तालुक्यातील 41, धानोरा तालुक्यातील 25, एटापल्ली तालुक्यातील 31, कोरची तालुक्यातील 30, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 48, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 12, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 14 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 84 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 319 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 148, अहेरी 32, आरमोरी 24, भामरागड 23, चामोर्शी 18, धानोरा 06 , एटापल्ली 14, मुलचेरा 03, सिरोंचा 07, कोरची 06, कुरखेडा 11, तसेच वडसा येथील 27 जणांचा समावेश आहे.