सौर ऊर्जाचे दिवे ग्रामीण भागात पडलेत धुळखात

24

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.25एप्रिल):-ग्रामीण भागातील विकास व्हावा या हेतूने ग्रामीण विकास मंत्रालय वेगवेगळ्या योजना राबवित असुन त्या योजनेमध्ये ग्रामीण भागात नेहमीच वीजपुरवठा राहत नसल्या मुळे गावा गावात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य राहत आहेत त्यामुळे या अंधारात नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत असतो आणी परत वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात आणी कधीकधी अंधारात साप,विचुं, सरपटणारे अशा प्रकारचे प्राणी घरात येत असतात व ते अंधारात लहान मोठ्याना चावतात त्यामुळे बऱ्याच नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.

तसेच गुरांना सुद्धा हे सरपटणारे प्राणी चावा घेतात व त्यांना सुद्धा प्राण गमवावा लागतो ते प्राणी मूर्त मुखी पडल्या मुळे शेतकऱ्याचे हजारो रूपयाचे अर्थीक नुकसान होते,त्याच बरोबर याच अंधाराचा फायदा काही समाज कंटक उचलतात ते घरात घुसून चोऱ्या व घरफोड्या सुद्धा करतात ते करत असताना
कधी घरच्यावर हल्ला सुद्धा करतात त्या हल्यात बरेच नागरिक जखमी होतात तर काहींना आपला प्राणही गमवावा लागतो,
या सर्व बाबीचा वीच्यार करून ग्रामीण मंत्रालयाने ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी प्रकाश नेहमीच रहावा व त्या ठिकाणी होणारे अपघात होऊ नये या करिता करोडो रुपये खर्च करून
ग्रामीण भागात सौर ऊर्जेचे दिवे लावण्याची योजना अंमलात आणली त्या नुसार ,पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या सहभागातून ही योजना करोडो रुपये खर्च करून अमलात आणली सर्व गावात हे चौका चौकात लावले पाहीजे होते मार्गील काही दिवस हे दिवे प्रकाश देत होते त्या मुळे गावात होणारे अपघात कमी झाले.

परंतु याला वाली कोणी नसल्या मुळे व ग्रामपंचयातीचे दिर्लक्ष असल्यामुळे हे दिवे नामशेष होऊ लागले , त्या ठिकाणी असलेल्या महागड्या वस्तू जसे की लाईट बॅटरी बन्याच ठिकाणच्या चोरीस गेल्या पण अद्याप त्या आरोपीचा शोध सुद्धा घेतल्या गेला नाही हि फारमोठी शोकांतीका आहे ,इत्यादी ईतर वस्तू चोरीला गेल्या हे सर्व ग्रामपंचायत उघड्या डोळ्यांनी पाहत होते, काही तर याच लोकांनी आपल्या घरी ते साहित्य नेऊन लावलेत की काय,,?ज्या संबधितावर ही जबाबदारी होती, त्यांनी कोणतीच जबाबदारी घेतली नाही, त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात जे शासनाचे करोडो रुपये या बाबीवर खर्च झाले.

ते संबधित विभागाच्या हलगर्जीपणा मुळेच ते चोरीला गेले असावे वास्तविक पहाता तेंव्हाची याची जबाबदारी ज्यांच्या वर होती, त्यां बाबत चौकसी देंखीलं झाली नाही चोर चोरी करून आज पर्यत पडद्या आडच पोलीस प्रशंसान सुस्त दोशी आरोपी असलेल्या कडून वसुली का नाहीं करावी जेणे करून अशी राष्ट्राची संपत्ती चोरी जाणार नाही व खराब होणार नाही या करिता याची सखोल चौकशी करणे हि काळाची गरज आहे, आज हे सौर ऊर्जेचे दिवे शोभेचे बनून धूळ खात पडले आहेत या बाबतची तात्काळ सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामीण मंत्रालया कडे प्रा महादेव गावंडे यांनी केली आहे,
“””'”‘”””””””””””””””””””””‘”””””””””””””””””
प्रति
शहर प्रतिनिधी/ता प्रति’
ग्रामीण भागातील सौर ऊर्जेचे दिवे जे आज संबंधित
विभागाच्या हलग्रजी पना मुळे जे धूळ खात पडून आहे या प्रसना ला वाच्या फुटावी व पुन्हा ग्रामीण भागात हे दिवे लागावे
व दोशी अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी व जे याच्या वर करोडो रुपये खर्च झाले ते वसूल व्हावे