राष्ट्रीय विश्वगामी बहुउद्देशीय पत्रकार संघ हेल्प सेंटरला मंजुरी

36

🔹पत्रकार संघाने सुरू केलेले देशातील पाहिले पत्रकार हेल्प सेंटर सुरू होणार नाशिकच्या मोहाडी येथून

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.25एप्रिल):-देशातील पत्रकारांना येणार्‍या समस्या सोडविण्यासाठी व संकटात असलेल्या पत्रकारांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी पत्रकारांचे स्वत:चे हेल्प सेंटर असावे अशी संकल्पना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाच्या वार्षिक ऑनलाईन सर्वसाधारण सभेत मांडली त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे राष्ट्रीय पत्रकार हेल्प सेंटर (मदत केंद्र) सुरू करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. भारत सरकारच्या नीती आयोग नोंदणीकृत असलेल्या या संघाच्या संचलित 53 संघ असून सभासदांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात येणार्‍या हेल्प सेंटरला सभेत मान्यता देण्यात आल्याने राष्ट्रीय पत्रकार हेल्प सेंटरला मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे.

पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील, प्रदेश सचिव रमेश देसाई राष्ट्रीय विश्‍वगामी शिक्षक संघ प्रदेश अध्यक्ष प्रा. भागवत महाले व राज्यातील 36 जिल्हा अध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली. यावेळी भारत सरकार RNI नोंदणीकृत साप्ताहिक विश्‍वगामी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांनी यावेळी सांगितले की, जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असलेल्या या सेंटरच्या माध्यमाने देशात कुठेही असलेल्या पत्रकारांना हेल्पलाईन द्वारे स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणेच्या सहकार्याने तात्काळ मदत मिळवून दिली जाणार आहे.

हेल्प सेंटर वर्षातील 365 दिवस दिवसातील 24 तास पत्रकार बांधवांसाठी व सभासदांच्या सेवे साठी सुरू असेल. याच धर्तीवर बहुउद्देशीय राष्ट्रीय विश्‍वगामी संघाचे फेसबुक पेज देखील सुरू करण्यात आले आहे. संघाची आकर्षक वेबसाइट पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सागर पाटोळे, प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील व प्रदेश सचिव रमेश देसाई यांच्या संकल्पनेतून सुरू होत आहे. पत्रकार संघाच्या या पेजला आपण सर्वांनी लाई व फॉलो करावे आणि हि पोस्ट आपल्या जवळील सर्व व्हॉट्सअप ग्रुप,फेसबुकवरील सर्व ग्रुप मध्ये शेअर सुध्दा नक्की करा असे आवाहन संघाच्या वतीने प्रदेश संघटक विजय केदारे यांनी केले आहे.