प्रसंगी रिपब्लिकन भवन कोरोनाग्रस्तांसाठी मोकळे करून देणार

(माजी आमदार टी एम कांबळे यांचे सुपुत्र रिपाई डेमोक्रॅटिक चे पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी ग्वाही)

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.25एप्रिल):-कोरोनाग्रस्तांसाठी जागेचा अभाव दिसून येत आहे, प्रसंगी रिपब्लिकन भवन उपचारासाठी मोकळे करून देण्याची ग्वाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी नुकतीच दिली.*

सद्या कोरोना परीस्तिथी भयाण वाढली असून औषध ऑक्सिजन बेड आणि जागेचा प्रचंड अभाव दिसून येत आहे. देशासह महाराष्ट्र राज्यात मृत्यूचे थैमान वाढले आहे, प्रचंड जीवितहानी होत आहे, माणसाचे माणूसपण हिरावले आहे, भयावह स्थिती निर्माण झाली आहे, बाहेर पडावे तर कोरोना मुळे जीव जातोय, घरात बसावं तर भुकेने जीव जातोय.

काय करावे काही समजत नाही, समाज मृत्यूच्या दाढेत अडकला आहे, प्रसंगी फोर्ट येथील रिपब्लिकन भवन उपचारासाठी मोकळे करून देण्याची ग्वाही दिवंगत आमदार टी एम कांबळे यांचे उच्चशिक्षित सुपुत्र व पक्ष प्रमुख कनिष्क कांबळे यांनी दिली.

अश्याप्रसंगी फक्त मोठमोठ्या व्यावसायिक लोकांनीच मदत करावी अस नाही तर राजकारण्यांनी सुद्धा हातभार लावावा, राजकारणात शिरून कमावलेली माया याकामी वापरली जावी, शिवाय सर्व मंदिरे शासनाने ताब्यात घेऊन तो निधी माणूस वाचवण्याकरिता वापरावा असा आशावाद राष्ट्रीय महासचिव सोसिल मीडिया प्रसिद्धी प्रमुख डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र, मुंबई, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED