कोरोनाने माजवला हाहाकार- प्रेमााणे करा एक दुस-याचा उद्धार – नजीर कुरैशी

28

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधि)

तलवाडा(दि.26एप्रिल):-राज्यभरातच नव्हे तर देशात करोनाने हाहाकार माजवला आसतांनाही ग्रामीण भागातील गर्भ श्रीमंत नागरिक एक दुस-याला आधार देऊन ऊध्धार करन्यापेक्षा मानसिक त्रास देन्यात धन्यता मानत आहे. कोरोनाच्या या संकट काळात एक दुस-याला आधार देऊन स्वताहसह दुस-याचांही ऊध्धार करावा आशी विनंती या प्रस्धिपत्राव्दारे दानविरांना नजीरभाई कुरैशी यांनी केली आहे. सध्याचे दिवस खुपच वाईट आहेत एका बाजुला करोनाने हाहाकार माजवला आहे तर दुसरी कडे उत्पन्नाची सर्व साधने थांबली आहेत सर्वांना सांभाळुन घेऊन एक दुस-यांना आधार देण्याचा सर्वांनीच प्रयत्न करावा.

कुणा विषयी मनात राग न धरता आपली प्रेमाची मानसे दुरावली जात आहे म्हणुन थोडी दक्षता घ्यावी भांडण आणी राग बाजुला ठेवावा ऊद्या आपण जीवंत राहतो की नाही ही शास्वती नसतांही आपण आपल्या तो-यात वागऊन कुणालाही नाराज करु नका सर्वांसोबत प्रेमााणे राहुन कमीत कमी समोरच्याला शाब्दिक आधार व समाधान तरी ध्या आसे आव्हाण या पत्रात नजीरभाई कुरैशी यांनी केले असुन भांडण तंट्याची व हेव्या दाव्याची ही वेळ नसुन कुणालाही नाराज न करता या संकट काळात काही आर्थिक मदत करता आली तर नक्किच करा नसता प्रेमाची देवान घेवान करुन प्रतेकाचे आशीर्वाद मिळवन्याचा प्रयत्न करा.

सुख कशाला म्हणतात ते स्वताह अनुभवा व इतरांनाही सुख मिळवावे या साठी प्रयत्न करा भारत देश हा आपले कुटुंब आहे चांगले मन व चांगला स्वभाव ही आपली संस्कृति आहे आपल्या संस्कृतिला गाल बोट लागनार नाही याची दक्षता घ्या कोरोना एक आशी शर्यत आहे जीथे धावनारा नव्हे तर थांबनारा जिंकेल म्हणुन स्वताह थांबूया व करोनालाही थांबूया आणी या कोरोनाच्या काळात आधाराची देवान घेवान करुन एक दुस-यांचा ऊध्धार करुया आसे आव्हाण पत्रकाच्या शेवटी नजीरभाई कुरैशी यांनी केले आहे.