सातारा पोलीस दलात नवीन वाहनांचे लोकार्पण

31
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

सातारा(दि.27एप्रिल):-समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.सातारा पोलिस दलातील पोलिसांना दिवसरात्र गस्तीसाठी वाहनांची आवश्यकता ओळखून सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३ कोटी ५० लाख रुपयांच्या २४ चारचाकी वाहने तर ४८ दुचाकी वाहने आज सातारा पोलिस दलाला सहकारमंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील,गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई,माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,माण खटावचे आमदार जयकुमार गोरे,सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्यासह आजी माजी पदाधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि पीडितांना तत्काळ न्याय व मदत मिळावी या उद्देशाने ‘डायल ११२’ ही संकल्पना पोलिस दलातुन राबविण्यात येते.या मोहिमेच्या अंतर्गत सातारा पोलिस दलाला आज वाहने सुपूर्द करण्यात आली.सातारा पोलिस दलातील बंधु भगिनींना ही वाहने दिवसरात्र गस्तीसाठी उपयोगी पडणार असून शहर व जिल्ह्यातील २५० ठिकाणी ‘क्युआर कोड’ सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली.याठिकाणी जाऊन गस्तीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर स्कॅनर स्कॅन करून त्यांच्या गस्तीसंदर्भात माहिती मुख्य कार्यालयास पोहचवली जाते.जिल्हा नियोजन निधीतून १३ स्कॉर्पिओ,५ बोलेरो,६ व्हॅन ४८ मोटारसायकली पोलिस विभागास देण्यात आली.हा निधी मंजूर केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे पोलीस दलाकडून आभार व्यक्त करन्यात आले