वझर येथे सॅनिटायझरची फवारणी

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

वझर(दि.27एप्रिल):- येथे कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी याठिकाणी सरपंच सौ.उज्वलाबाई नंदकुमार पळणीटकर व उपसरपंच नरसिंग चोरमल्ले यांच्या पुढाकाराने वझर या ठिकाणी सॕनीटायझरची फवारणी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरणाचा वाढता प्रभाव लक्षात घेता व नांदेड जिल्ह्यात दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण निघत असल्यामुळे व रोज वीस ते पंचवीस पेशंट म्रत्युमुखी पडत असल्यामुळे पूर्ण जिल्हाच कोरूना च्या भीतीने वावरत आहे.

वझर हे गाव कर्नाटकाच्या सीमेलगत असून या ठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पुढील काळात कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वझर येथील मारुती मंदिर परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, शिवाजी चौक परिसर, नवीन आबादी परिसर, व शाळेचे परिसर व गावातील सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत चे कर्मचारी गोपाळ कनजे व इतर जन उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED