घाटनांदूर येथे कोविड केअर सेंटर मुळे रूग्णांना प्रचंड फायदा

25

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई सर्कल प्रतीनीधी)मो:-९७६३४६३४०७

घाटनांदुर(दि.30एप्रिल):- २९.रोजी कोरोनाच्या संकटकाळात रूग्णांची वाढती संख्या व रुग्णांची होणारी गैरसोय, लक्षात घेता तसेच बिड जिल्हात शासकीय रुग्णालयात कींवा खाजगी रुग्णालयात पॉझिटिव्ह रूग्णांना बेड उपलब्ध नाहीत. घाटनांदुर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक दिवशी १४ते १५ रुग्ण पॉझिटिव्ह येतायत ही माहिती डॉ. विलास घोळवे यांच्या कडून मिळत आहे. पुर्वी पॉझिटिव्ह कांही रुग्ण गृह आलगीकरन करत होते. यामुळे संसर्ग होण्याची भीती नागरिक व्यक्त होत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन घाटनांदुर येथे वसुंधरा महाविद्यालयत व जामिया इस्लामिया इशातुल उलुम या संस्थेत हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.

यासाठी मानवलोक अंबाजोगाई जिल्हा परिषद बीड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ५० खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री आ. धनंजय मुंडे व मा. सुप्रिया सुळे यांनी आँनलाई पध्दतीने केले. तसेच मा. आ. संजय दौंड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, डॉ अनिकेत लोहिया, सभापती गोविंदराव देशमुख, उपसरपंच, बाळासाहेब देशमुख,माजी सरपंच बाप्पा जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे सेंटर उभारण्यात आले.