कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी घुंगराळा येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे रक्तदान शिबीर संपन्न

25

🔸वसंत सुगावे पाटील यांची माहिती

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)

नांदेड(दि.30एप्रिल):-जिल्ह्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असून या कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी रक्ताची गरज भासत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष *शरद पवार* , उपमुख्यमंत्री *मा.अजितदादा पवार* ,प्रदेशाध्यक्ष मा. *जयंत पाटील* , व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष *महेबूब शेख यांनी* केलेल्या आवाहानांनुसार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस *वसंत सुगावे पाटील* यांनी घुंगराळा येथे रक्तदान शिबाराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबाराचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष *हरिहरराव भोसीकर* यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायगाव चे तहसीलदार *गजानन* *शिंदे,* राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष *भास्करराव पा. भिलवंडे* , कुंटुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक *पठाण साहेब* , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हासरचिटणीस *डी* *. बी. जांभरूनकर* ,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसचिव *बाळासाहेब भोसीकर* ,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष *मारोतराव कदम* ,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष *अमोल सातेगावकर* ,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग नायगाव तालुकाध्यक्ष *केरबा रावते* ,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष *व्यंकट पा.शिंदे* , *श्याम चोंडे,माधव कोरे* यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच या कार्यक्रमास घुंगराळा येथील विस्तार अधिकारी मातावाड साहेब,माजी उपसरपंच शिवाजी पा. ढगे,दंडेवाड साहेब,किसन पा. सुगावे, ग्रामपंचायत सदस्य गोविंदराव पांचाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम यमलवाड, गंगाधर पा. ढगे,चंद्रप्रकाश ढगे,कैलास पा. सुगावे,शालेय समिती अध्यक्ष माधवराव पा.ढगे,विठ्ठल बास्टे, संजय गजभारे,उत्तम गजभारे यांची उपस्थिती होती.या रक्तदान शिबीरात *56* रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबीरास *गुरू गोबिंद सिंघ रक्तपेढी* ,नांदेड यांनी रक्तसंकलन केले.या रक्तदान शिबीरात नायगाव तालुक्यातील घुंगराळा, कुंटुर ,शेळगाव, सातेगाव,कहाळा, कृष्णर,देगाव, मांजरम येथिल युवकांनी रक्तदान केले.

हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी राजेश ढगे,विलास ढगे, योगेश ढगे , रोहिदास ढगे, व्यंकट यलपलवाड, ज्ञानेश्वर सुगावे,खदीर शेख,शंतनू ढगे,सखाराम सुगावे,सोहेल शेख, नितीन बासाटवार,शुभम गबाळे,इसाक शेख, शंकर यमलवाड,उमेश कदम,अंकुश जलदेवार यांनी परिश्रम घेतले.