डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण ट्रस्ट तर्फे म्हसवड प्रा.आ.केंद्रास वैदयकिय साहित्यासाठी आर्थीक मदत

32
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

माण(दि.30एप्रिल):-तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत याचाच विचार करून भारती विद्यापीठ पुणे डॉ.पतंगराव कदम आपत्ती निवारण ट्रस्टतर्फे म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र साठी ६.६६ लाख रूपयाचे कोरोना निवारणासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य देन्यात आले.

यावेळी भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप, सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव,जिल्हा उपाध्यक्ष एम के भोसले.जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर,नगरसेवक विकास गोंजारी,अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल लोखंडे,नगराध्यक्ष तुषार वीरकर,विरोधीपक्ष नेता अकील काझी व राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष युवराज सूर्यवंशी,माजी नगराध्यक्ष विजय धट तसेच
अनेक मान्यवर उपस्थित होते