कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करू नका

27

🔸खासदार बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सूचना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.3मे):-मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुत्यू पावलेल्या लोकांच्या देखील आकड्यात वाढ होत आहे. लोकांमध्ये देखील भीतीचे वातावरण दिसून येत आहे. त्यात वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोर्टर व समाजमाध्यमात मुत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियातील व्यक्तींना व परिसरातील नागरिकांना मनस्ताप होत असतो. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करू नका अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोकांच्या मृत्यू होत आहे. मोठ्या प्रमाणात या विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट देखील लवकरच येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त
केली आहे. परंतु या मध्ये जे व्यक्ती मृत्यू पावत आहेत. त्यांच्या वार्डाचे व वयाच्या उल्लेख असलेली प्रेस नोट प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात येते. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना व कुटुंबातील लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करू नका संबधीत विभागाला तसा निर्देश द्या अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केली आहे.