माजी आमदार सानंदांचा वाढदिवस ऊत्साहात साजरा

70

🔹कार्यकर्त्यांनी घेतला संकल्प नगरपालिका व सहकारी संस्था ताब्यात घेण्याचा

✒️मनोज सरनाईक (विशेष प्रतिनिधी)

खामगाव(दि.3मे):-दि.१४एप्रिल ते १ मे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा झालेला वाढदिवस पंधरवाडा खामगाव विधानसभेसह संपुर्ण जिल्ह्यात ऊत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमीत्याने दिव्यांगांना ट्रि सायकलीचे वितरण,गरजु निराधारांना किराणा सामानाचे वाटप, महिलांना साड्यांचे वाटप जनावरांना ढेप व चार्याचे वाटप महत्वाचे म्हणजे रुग्णालयामध्ये रक्ताचा साठा वाढविण्यासाठी रक्तदानाचा कार्यक्रम कोरोनाचे नियम कटाक्षाने पाळुन नियोजन पध्दतीत संमप्न झाला.

प्रत्येक प.स.सर्कल जि.प विभागातील तसेच शहरातील असलेल्या प्रभागामधील कार्यकर्ते यांनी यासाठी परिश्रम घेतले.नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असणारे कर्मयोद्धा लोकनेते राणा दिलीपकुमार सानंदा यांनी या कार्यक्रमाचे माध्यमातुन काही महिन्यावर येऊन पडलेली बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी खामगाव नगरपालीका याची तयारी या कार्यक्रमातुन स्पष्ठपणे दिसुन आली आहे.तसेच यासोबत क्रुषि ऊत्पन्न बाजार समिती,तालुका खरेदी विक्री संस्था याचे नियोजन ही या सोबत करण्यात आले आहे.भाजपाचे एकेकाळी मात्बर असलेले नगरसेवक वा पञकार किशोर भोसले यांनी सानंदा साहेबांची साथ धरली असल्याने तसेच अजुनही काही समाजसेवक यांना साथ देणार असल्याचे पहावयास मिळत आहे.

नुकत्याच झालेल्या असंख्य ग्रामपंचायतीवर कांग्रेस समर्धीत महाविकास आधाडीचा झेंडा फडकविण्यात यश संपादन केल्याने वरिल तिन्ही संस्था ताब्यात घेण्याचा पक्का ईरादा या कार्यक्रमातुन दिसुन आला आहे.या वाढदिवस पंधरवाडा साजरा करण्यासाठी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतली ती वाखण्या योग्य होती जवळपास ४५० रक्ताची बॅग जमा करुन सर्व समाजाला रक्तदान महादान यामुळे सानंदासाहेबांनी सांगितलेकी या रक्तदात्याचे ऊपकार कधीच विसरणार नाही.